डोंंबिवली : भारत देशात विविध पातळ्यांवर परिवर्तन सुरू आहे. यापूर्वीच्या पतनाकडून उत्थानाकडे होणारा हा परिवर्तनाचा प्रवास समाज, राष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारा आहे. देश, जगासमोर सन्मान वाढविण्याची संधी भारत देशाला मिळणार आहे. आपल्या मूळ हिंदू धर्म संस्कृतीचा विचार केला तर भारत सुपरपाॅवर नव्हे तर सुपरराष्ट्र होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश उर्फ भैय्याजी जोशी यांनी मंगळवारी येथे केले.

मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाच्या सेवानिवृत्त प्रमुख डोंबिवली निवासी डाॅ. शुभदा जोशी यांच्या जीवनपटावर त्यांची बहिण नंदिनी पित्रे यांनी ‘शुभपर्व’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवली जीमखाना येथील कार्यक्रमात संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी भैय्याजी जोशी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची उपाध्यक्ष डाॅ. विनय सहस्त्रबुध्दे, डाॅ. शुभदा जोशी, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रंथालीने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

हेही वाचा…डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक

भारत सुपरपाॅवर झाला पाहिजे असे आपण म्हटल्यावर, एका विचारवंताने आपणास ‘तुम्ही ज्या पठडीतून जात आहेत त्या शिकवणुकीत, संस्कृतीच्या सूत्रसंकल्पनेत कोठे सुपरपाॅवर शब्द दिसला आहे का,’ असा प्रश्न केला. त्यावेळी आपण स्तब्ध झालो. आपली हिंदु धर्म संस्कृती ही विचार, तत्वज्ञान, ज्ञान, संस्कृती, समाज रक्षण, विकास अशा अनेक मुल्यांवर उभी आहे. जग या संस्कृतीपासून प्रेरणा घेत आहे. आपले मूळ चिंतन ही हिंदू धर्म, संस्कृती. आपल्या मूळ चिंतन, विचारात नसलेल्या सुपरपाॅवर पेक्षा भारत सुपर राष्ट्र झाला पाहिजे, असे मत भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया भक्कम होता. त्यामुळे बाह्य कितीही आक्रमणे झाली तरी काही पतनाचा काळ सोडला तरी आपण खंबीर राहिलो. हजारो वर्षाची परंपरा भारताला आहे. ती आपण विसरता कामा नये. समाज सुधारकांनी केलेल्या कामामुळे हिंदू धर्म कधी संंपला नाही. संस्कृती संवर्धनासाठी ज्या व्यवस्था उभ्या राहिल्या त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. हेच संवर्धनाचे काम यापुढे डाॅ. शुभदा जोशी यांसारखी मंडळी करतील, असे जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा…डोंबिवलीत चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले

मुंबई विद्यापीठातील तत्वज्ञान विभाग विकसित करण्यात डाॅ. शुभदा जोशी यांचा मोलाचा वाटा आहे. प्रसिध्दीच्या विविध तंत्राने समाज पुढे जात असताना डाॅ. शुभदा जोशी यांनी तंत्रापेक्षा मंत्राला किती महत्व आहे. हे या पुस्तकाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. भविष्यवेधाचा विचार करून डाॅ. जोशी यांनी हिंदुत्व विषयावर लिखाण करावे, असे डाॅ. सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले

Story img Loader