ठाणे : ठाणे शहरात गावठी हात बाॅम्बचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रायगड येथील माणगाव भागातील एका तरूणाला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याच्याकडून १० हात बाॅम्ब जप्त केले आहेत. त्याच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. हे गावठी हात बाॅम्ब रान डुकरांच्या शिकारीसाठी वापरले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

साकेत रोड परिसरात एकजण गावठी हात बाॅम्ब घेऊन येत असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, गुन्हे अन्वेषण शाखेच्या मध्यवर्ती शोध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या पथकाने सापळा रचला. त्यांच्या पथकासोबत बाॅम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक होते. पथकांनी साकेत परिसरात तरूणाला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता, बॅगमध्ये १० हात बाॅम्ब आढळून आले. याप्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने हे हात बाॅम्ब सातारा येथून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याच्या इतर साथिदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. हे हात बाॅम्ब रान डुकरांच्या शिकारीसाठी वापरले जाणार होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader