लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: तुमच्या शर्टाच्या पाठीमागील बाजूला कचरा पडला आहे. तो मी साफ करून घ्या. तुमच्या हातामधील पिशवी बाजुला ठेवा, अशी बतावणी करत बँकेतून पैसे काढून घरी चाललेल्या एका नागरिकाकडील एक लाख रूपये भामट्यांनी लंपास केले. गुरूवारी दुपारी कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागात हा प्रकार घडला.

Donation boxes stolen from 50 year old temple in Thane
ठाण्यातील ५० वर्ष जुन्या मंदिरातील दानपेट्या चोरीला
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
36 year old man attacked police officers at gadevi with stone on Thursday
सराफ बाजारात कारागिराकडील २० लाखांचे दागिने चोरी; पिशवी हिसकावून चोरटे पसार
bmc impose waste management charges in Mumbai
मुंबईत कचऱ्यावर साडेसात हजारांपर्यंत शुल्क; खर्च वाढल्याने पालिकेकडून प्रस्ताव
Cash worth Rs 16 lakh found in house of corrupt employee of Kalyan Dombivali Municipality
कल्याण डोंबिवली पालिकेतील लाचखोर कर्मचाऱ्याच्या घरात सापडली १६ लाखाची रोकड
‘एमपीएससी’ प्रश्नपत्रिकेचे आमिष प्रकरणी नागपूरमधून आणखी दोघे अटकेत
Who collected penalty of 60 lakhs in month from people who throw garbage
कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली कोणी केली?
thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार

काटेमानिवली येथील फुडीज कॉर्नर दुकाना समोरील रस्त्यावर हा प्रकार गुरूवारी दुपारी १२ वाजता घडला. रामस्वामी उपाध्याय (५४) असे लूट झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. ते चक्की नाका भागात राहतात.

आणखी वाचा-अंबरनाथ: वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागेला शेतकी सोसायटीचा विरोध

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार रामस्वामी गुरूवारी दुपारी काटेमानिवली भागातील त्यांचे खाते असलेल्या बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. बँकेतून एक लाख रूपये काढून त्यांनी ती रक्कम जवळील पिशवीत ठेवली. बँकेतून बाहेर पडल्यानंतर बँके बाहेर पाळत ठेऊन असलेल्या एका भामट्याने रामस्वामी यांच्या पाठीमागून जाऊन त्यांना तुमच्या शर्टाच्या पाठीमागील बाजूला कचरापडला आहे. तुमचा शर्ट खराब झाल्याने तो तात्काळ धुऊन घ्या, असा सल्ला दिला.

भामट्याने एक माठ आणि तेथे पेला असलेल्या ठिकाणी रामस्वामी यांना थांबविले. रामस्वामी यांना कचरा साफ करण्यासाठी पाण्याने भरलेला पेला त्यांच्या हातात दिला. पाणी शर्टावर पडल्यानंतर हातामधील पिशवी भिजेल म्हणून भामट्याने पिशवी बाजूला असलेल्या कट्ट्यावर ठेवण्यास सांगितले. रामस्वामी यांनी शर्टावर पडलेला कचरा धुण्यासाठी शर्ट काढला. ते शर्ट धुण्यात व्यस्त असताना भामट्याने त्यांना बोलण्यात गुंतवून माठा जवळील कट्ट्यावर ठेवलेली रामस्वामी यांची नजर चुकवून लंपास केली. त्यात एक लाख रूपये होते. रामस्वामी यांनी चोर म्हणून ओरडा करत त्याचा पाठलाग केला, तोपर्यंत तो पळून गेला होता. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader