लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: डोंबिवली शहराच्या काही भागात गुरुवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने काही वेळ हजेरी लावली. एकीकडे उन्हाचे चटके, घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले असताना अचानक अवकाळी पाऊस सुरू झाल्याने नागरिक सुखावले.

दुपारी १२ वाजल्यापासून काळ्या ढगांची जमवाजमव आकाशात सुरू होती. दुपारी दीडच्या सुमारास आकाशातील काही भाग काळ्या ढगांनी वेढून गेला. अचानक पावसाची रिमझिम सुरू झाली. कडक उन्हाच्या चटक्यात पाऊस सुरू झाल्याने नागरिक अचंबित झाले. पाऊस सुरू झाल्यानंतर मुलांनी काही वेळ पावसात भिजणे पसंत केले.

आणखी वाचा- कल्याणमध्ये वृध्देला मारहाण करुन सोन्याचा ऐवज लुटणारे दोनजण अटकेत

दुपारी दीड नंतर विखुरलेल्या ढगांनी आकाश व्यापल्याने उन्हाचा चटका कमी झाला. काळ्या ढगांमुळे संध्याकाळच्या वेळेत पाऊस पडण्याची शक्यता जुन्या जाणकारांकडून व्यक्त केली जात होती.