ठाणे: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासकीय रुग्णालयात भरती झालेल्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे तसेच समान काम समान वेतन मिळावे या मागणीसाठी राज्याच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीने सोमवारी काम बंद आंदोलन केले. दोन तास हे आंदोलन सुरु होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध शासकीय रुग्णालयात गेले १५ ते १६ वर्ष कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य सेवा देत आहेत. करोना काळातही केंद्र सरकार तसेच राज्य सरकार मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य विषयक उपक्रमांमध्ये या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. परंतु तूटपूंजे मानधन मिळत असल्याचा आरोप अधिकारी- कर्मचारी करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन करावे यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीने आझाद मैदान येथे आक्रोश आंदोलन पुकारले होते. त्यांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेऊन यापुढे शासकीय भरतीमध्ये ३० टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली.

हेही वाचा… ठाणे: वाद सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला भोसकले

परंतु, सेवेत १७ ते १८ वर्ष झाली आहेत. त्यामुळे ३० टक्के ऐवजी ५० टक्के आरक्षण मिळावे आणि जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत समान काम समान वेतन मिळावे या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी दोन तास कामबंद आंदोलन केले. यावेळी त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strike by health contract employees for 50 percent reservation in recruitment and equal pay in thane dvr