बदलापूर: राष्ट्रीय हरित लवादाने अंबरनाथ पालिकेला चिखलोली येथील जागेवर कचरा न टाकण्याच्या दिलेल्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा कचरा बदलापुरच्या कचराभूमीवर टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर या निर्णयाला आता बदलापुरात तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्यासाठी सर्वपक्षीय एकवटले असून हा कचरा टाकू दिला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. कचरा प्रकल्पाला नाही तर कचरा टाकण्याला विरोध असल्याचे सर्वपक्षियांकडून सांगितले जाते आहे. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेला नवा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा >>> ठाण्यातील महिला मारहाण वादात भाजपची उडी; पदाधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या भुवय्या उंचावल्या 

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव

अंबरनाथ पालिका अनेक वर्ष बेकायदा पद्धतीने उभारलेल्या कचरा भूमीवर कचरा टाकत होती. त्या कचरा भुमीसमोर कनिष्ठ न्यायालय स्थापन झाल्याने ही कचरा भूमी बंद करावी लागली. पुढे पालिकेने अंबरनाथच्या चिखलोली येथे कचरा टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र पावसाळ्यात आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यामध्ये कचराभूमीचे दूषित काळे पाणी झिरपू लागले. शेजारच्या गावातील शेतांमध्ये पिके वाया गेली. दुर्गंधी, डास यामुळे नागरिक त्रस्त झाले. याविरुद्ध स्थानिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेत ही कचराभूमी बंद करण्याची मागणी केली होती. लवादाने त्यावर सुनावणी घेत अंबरनाथ नगरपालिकेला दंड ठोठावला आणि कचराभूमीला पर्याय देण्याचे आदेश दिले. नुकतेच ठाणे जिल्हाधिकारी यांनी अंबरनाथ पालिकेला शहराचा कचरा बदलापूरच्या कचरा भूमीवर टाकण्याचे आदेश दिले.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

या आदेशानंतर बदलापूर शहरातून या आदेशाला तीव्र विरोध होऊ लागला आहे. मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेत अंबरनाथचा कचरा बदलापूर कचरा भूमीवर टाकण्यास विरोध केला. तर शिवसेनेनेही या निर्णयाला विरोध केला आहे. अंबरनाथ शहराचा कचरा बदलापूर शहरात येऊ देणार नाही, असा ठाम पवित्र सर्वपक्षियांनी घेतल्याने अंबरनाथ पालिकेला पुन्हा नवा जागेचा पर्याय शोधावा लागणार आहे. याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना विचारले असता, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सामंजस्याने कचरा प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून लवकरच घनकचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. तर  बदलापूर शहराने आपली कचरा भूमी संयुक्त कचरा प्रकल्पासाठी देऊ केली आहे. हा प्रकल्प राजासाठी आदर्श ठरणार आहे. मात्र त्या प्रकल्पापूर्वी अंबरनाथ शहराचा कचरा स्वीकारला जाणार नाही. आमचा प्रकल्पाला विरोध नाही तर त्याआधी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला विरोध आहे, असे शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी सांगितले आहे.