डोंबिवली जवळील खंबाळपाडा येथील मंजुनाथ महाविद्यालयाच्या बाहेर एका विद्यार्थ्याला या भागातील दोन तरुणांनी मंगळवारी संध्याकाळी बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकाराने विद्यार्थी घाबरला होता.
हेही वाचा >>> ठाणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची कार्यालयांना पुन्हा टाळे; महापालिकेच्या प्रशासनाची कारवाई
फरदीन पटेल, मोहीत अशी आरोपींची नावे आहेत. क्रीश मिश्रा असे तक्रारदार विद्यार्थ्याचे नाव आहे. तो गांधीनगर मध्ये राहतो. क्रीश नेहमीप्रमाणे महाविद्यालया बाहेरील रस्त्यावरुन जात असताना आरोपी पटेल, मोहीत यांनी त्याला अडवून तू त्या मुलीपासून दूर राहा नाहीतर तुला सोडणार नाही असे बोलून शिवीगाळ करत दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. ठोशाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने क्रीशचा एक दात तुटला आहे. क्रीशने आरोपींच्या ताब्यातून सुटका करुन तो पुढे गेला. त्यावेळीही त्यांनी त्याचा पाठलाग करुन त्याला लाकडी काठ्यांनी मारहाण केली. क्रीशच्या तक्रारीवरुन टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.