कल्याण- जुन्या भांडणाचा राग मनात धरुन बिर्ला महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एक विद्यार्थी आणि त्याच्या मित्राला महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारावर सोमवारी दुपारी चार जणांनी बेदम मारहाण केली. गेल्या काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवलीतील महाविद्यालयांबरोबर विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी महाविद्यालय परिसरात गस्त वाढविण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उल्हासनगर: बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; रस्ते कामावरून जुंपली, दोघे जखमी

जयदीप विठ्ठल जाधव (१९, रा. कोनगाव, भिवंडी) असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दीपेश लोखंडे आणि त्याच्या तीन मित्रांनी जयदीपला मारहाण केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, जयदीप जाधव आणि त्याचा मित्र सोमवारी दुपारी बिर्ला महाविद्यालयात फाऊंडेशन कोर्सचा परीक्षेचा पेपर संपवून घरी जाण्यासाठी महाविद्यालया बाहेर पडला होता. महाविद्यालय प्रवेशव्दारावर जयदीप अभिषेक पोले या आपल्या मित्रा सोबत बोलत उभा होता. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन जयदीपला मारहाण करण्यासाठी दिपेश लोखंडे तेथे मित्रांसह पाळत ठेऊन उभा होता. जयदीपला पाहताच दीपेश आणि त्याचे तीन मित्र त्याच्या दिशेने धावत जाऊन थेट मारहाण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दीपेशचा मित्र अभिषेक भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला. त्यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना एका आरोपी तरुणाने धारदार टणक वस्तू घेऊन ती जयदीप आणि अभिषेकला मारली. त्यात दोघेही जखमी झाले. मारहाणी नंतर आरोपी पळून गेले. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. सुरवसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student brutally beaten at the entrance of birla college in kalyan zws