कल्याण : येथील पूर्व भागातील चक्कीनाका वाहतूक पोलीस चौकीजवळ एका मोटार कार चालकाने भरधाव वेगात कार चालवून रस्त्याने पायी चाललेल्या एका विद्यार्थ्याला जोराची धडक दिली. या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सकाळच्या वेळेत हा अपघात घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितुराज रवींद्र यादव असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात राहतो. त्याला पादचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. रितुराज हा रविवारी सकाळी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागातून पायी चालला होता. रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक समोरून एक मोटार कार चालक भरधाव वेगात आला. तो बाजुने जाईल असे वाटले असतानाच त्या मोटारीने रितुराजला जोराची धडक दिली. या धडकेत रितुराज रस्त्यावर फेकला गेला. कार चालकाने तातडीने ब्रेक दाबल्याने मोठी दुर्घटना टळली.

हे ही वाचा…घोडबंदर भागात विविध प्रकल्पांची आखणी

पादचाऱ्यांनी ओरडा केल्याने, मोटार कार चालकाला रोखून धरल्याने तो तेथेच थांबला. तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, असे पादचाऱ्यांनी सांगितले. पादचाऱ्यांनी या अपघाताची माहिती यादवच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीय आणि काही पादचाऱ्यांनी रितुराजला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रितुराजच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी वाहन चालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student seriously injured in collision with car in kalyan east sud 02