कल्याण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गुरुवारी शहाड रेल्वे स्थानकात धावत्या मालगाडी खाली उडी मारून आत्महत्या केली. फलाटावर प्रवासी म्हणून उभ्या असलेल्या तरुणाने अचानक हा प्रकार केल्याने खळबळ उडाली. शहाड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हा प्रकार कैद झालाआहे. याप्रकरणी कल्याणच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यातअकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सनी बैसाने असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सनी हा अभ्यासात अतिशय हुशार असल्याचेत्याच्या नातेवाईकाने सांगितले. सनीने बीएपर्यंत शिक्षण घेतले होते. नागरिकांची सेवा करावी म्हणून त्याने सरकारी नोकरीत जाण्याचा विचार केला होता. यासाठी त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती.
मिळालेली माहिती अशी की, एका तरुणीसोबत त्याचे प्रेम संबंध होते. या तरुणीने सनीकडे पैसे,दागिने आणि लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे सनी हा मानसिक तणावाखाली होता. या तणावातून त्याने शहाड रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी एका मालगाडीसमोर स्वतःला झोकून दिले. सनीच्या आत्महत्येला त्याला ब्लॅकमेल करणारी तरूणी जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांनी केला आहे.त्यामुळे या तरुणीवर कारवाई करण्याची मागणी सनीच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेची दृश्य चित्रफित समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाली आहे. त्याआधारे पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केले आहे