ठाणे : नौपाडा येथील महात्मा गांधी रोड परिसरातील इमारतीच्या सदनिकेत रविवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागताच सदनिकेतील कुटुंबिय घरातून सुरक्षित बाहेर पडल्याने दुर्घटना टळली. महात्मा गांधी रोड परिसरात तळ अधिक तीन मजली इमारत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे ही वाचा…कल्याणमध्ये हॉटेलच्या स्वयंपाकीला बेदम मारहाण

या इरतीतील दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत तीन जण वास्तव्यास आहेत. रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या सदनिकेत अचानक आग लागली. आग लागताच तिघेही सुरक्षित बाहेर पडले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासाभराने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात पथकाला यश आले. या आगीत घरातील काही साहित्य जळाले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudden fire broke out in flat in mahatma gandhi road area of naupada in thane on sunday midnight sud 02