सुधीर फडके यांच्या सुरांनी शब्दांना सजवले तर अजय-अतुल यांनी त्याच सुरांना रसिकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवून दिले आहे. मन प्रकाशमान करणार संगीत म्हणजे लाइट व्होकल. दिग्गज कलाकारांच्या या दोन पिढीतला खेळ सुरांच्या साक्षीने शुक्रवारी सायंकाळी डोंबिवलीकरांनी अनुभवला. निमित्त होते डोंबिवली जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या जत्रेचे. या जत्रेत विविध कलेची जादू रसिकांनी अनुभवली. विजयराज बोधनकर यांनी चित्र रेखाटल्यानंतर सुधीर फडके ते अजय-अतुल यांच्या सांगीतिक प्रवासाची ही मैफल रंगली होती.
रवींद्र साठे, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, सावनी रवींद्र, प्रसन्नजीत कोसंबी, ऊर्मिला धनगर या कलाकारांनी आपल्या आवाजाने जणू काही रसिक प्रेक्षकांवर जादूच केली होती. वंद्य वंदे मातरम् हे गाणे सर्वानी एकत्रितपणे सादर केल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाट झाला. त्यानंतर प्रथमेश लघाटे याने इंद्रायणी काठी देवाची आळंदी आणि झाला महार पंढरीनाथ ही गाणी सादर केली. ही गाणी सादर झाल्यानंतर जणू काही सावळ्या पंढरीरायाची भेट झाल्याचा भासच रसिकांना झाला. प्रेम ही सगळ्यात उत्कट भावना असून प्रियकराचे घर कसे आहे हे सांगणारे त्या तिथे पलीकडे तिकडे हे ग.दि.मा. यांनी शब्दबद्ध केलेले व मालती पांडे यांनी गायलेले गाणे आर्या आंबेकर हिने तिच्या गोड गळ्यातून सादर केले. राजाच्या रंग महाली आणि अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले गोऱ्या गोऱ्या गालावरी हे गाणे ऊर्मिला धनगर आणि सावनी रवींद्रने सादर केले. त्यानंतर लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला या रवींद्र साठे यांनी गायलेल्या तसेच रानी माझ्या मल्यामंधी घुसशील का या गाण्यांनंतर रसिक डोंबिवलीकरांनी वन्समोर अशी दाद दिली. तर लावणी ही तर महाराष्ट्राची शान असून जणू काही ती मराठी भाषेचा चेहरा आहे. या वेळी मला लागली कोणाची उचकी तसेच उगवली शुक्राची चांदणी या लावण्या सादर करण्यात आल्या. या वेळी क्रिष्णा मुसळे आणि विजय जाधव यांनी खास शैहातील ढोलकी वाजवून रसिकांच्या शिट्टय़ा मिळवल्या. अभिनेत्री समिरा गुर्जर हिने केलेल्या खुमासदार शैलीतील निवेदनामुळे कार्यक्रमाला रंगत चढली होती. रसिक डोंबिवलीकरांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. या कार्यक्रमाला अभिनेते अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, संदीप पाठक यांनी हजेरी लावली.

देशभरातील रसिकांच्या मनाचा ठाव
मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या मराठी गाण्यांना मरण नाही हे रसिकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. भावभावनांचा अस्खलित आलेख मांडणारी ही गाणी मुळातच रसिक असणाऱ्या ठाणेकारांना नेहमीच भावतात आणि मग सुरू होतो टाळ्यांचा कडकडाट आणि कार्यक्रम संपेपर्यंत आवडणाऱ्या गाण्याला मनापासून आणि भरभरून दाद देण्याचा एक विशेष प्रवास. रघुलीला एंटरप्रायझेस निर्मित गाणी अंतरंगातील या कार्यक्रमांतर्गत शनिवारी सायंकाळी सहयोग मंदिर येथे डोंबिवलीतील गायक कलाकारांनी त्यांच्या आवाजातून ठाणेकरच नव्हे तर यूटय़ूबवर प्रत्यक्ष स्क्रिनिंग चालू असल्याने देशभरातून अनेक रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
श्रेष्ठ कविवर्याचे शब्द, दिग्गज कलाकारांनी दिलेले संगीत आणि गाणाऱ्यांच्या गळ्यात तसेच वाजवणाऱ्याच्या हातात सप्तसुरांचे अस्तित्व असणाऱ्या कलावंतानी घेतलेली तान हा त्रिवेणी संगम सहयोग मंदिर येथे पाहावयास मिळाला. या वेळी मन शुद्ध तुझं गोष्ट आहे हे गाणे केतकी भावे-जोशी हिने सादर केले. त्यानंतर विकल मन आज झुरत असहाय हे गाणे केतकीने सादर केल्यानंतर रसिकांनी पुन्हा गाणं सादर करण्याची मागणी केली. या वेळी संगीत म्हणजे सप्तसूर आणि शब्दच नव्हे तर त्या शब्दांचा अर्थ सांगणाऱ्या सुवासाची मुक्त उधळण करणारे एक फूल असते याची तंतोतंत जाणीव रसिकांना झाली. त्यानंतर नयन तुझसाठी आतुरले, डोळ्यात वाच माझ्या तु गीत भावनांचे, लाजून हासणे अन् हासून ते पहाणे, हृदयी प्रीत जागते जाणता न जाणता, नवीन आज चंद्रमा, माझे राणी माझे मोगा आदी गाणी हृषिकेश अभ्यंकर, धनंजय म्हसकर, गायत्री शिधये आदी कालाकारंनी सादर केली. त्यानंतर सावळे सुंदर रूप मनोहर गाणे सादर केल्यानंतर रसिक आणि दानशूर असणाऱ्या ठाणेकरांनी हृषिकेशला पाचशे एक रुपयांचे बक्षीसही दिले. या वेळी सहयोग मंदिर सभागृह गर्दीने तुडुंब भरला होता. काही रसिकांनी उभं राहूनच कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. त्यानंतर जशी गर्दी वाढत गेली तसे सभागृहात चटई टाकून रसिकांनी गाणी ऐकली. तबल्यावर साथ देणाऱ्या अमेय ठाकूरदेसाई याने तबल्याचा काळ्या शाईच्या तालातून जणू काही पौर्णिमेच्या चंद्रालाच खाली येण्याचे आवाहन केल्याचा भास रसिकांना झाला. या वेळी ढोलकीची साथ सुशांत बर्वे, साइड ऱ्हिदम साथ कौस्तुभ दिवकेर, कीबोर्ड झंकार कानडे आणि संवादिनीची साथ सुखदा भावे-दाबके यांनी दिली.

atharvaveda bhumi suktam
भूगोलाचा इतिहास: वसुंधरेच्या कायापालटाची कहाणी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
shivani rangole emotional post
आजेसासूबाई डॉ. वीणा देव यांच्या निधनानंतर शिवानी रांगोळेची भावनिक पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या हसऱ्या आठवणी…”
Paaru
‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’चा महासंगम; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “अशी अंधश्रद्धा…”
India before modernity
ना उजवा, ना डावा; का होतोय भारतीय इतिहासाच्या पुनर्लेखनाचा शास्त्रीय विचार?
loksatta readers response
लोकमानस: चेंगराचेंगरी कुठपर्यंत सहायची…?
Rishi Kapoor And Riddhima Kapoor
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कुटुंबाला करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; रिद्धिमा कपूर म्हणाली, “अशी एक वेळ…”