ठाणे : यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून त्यामुळे पंखे, कुलर आणि वातानुकूलीत यंत्रणाचा वापर वाढू लागला आहे. परंतु घरातील जुन्या झालेल्या विद्युत तारा वाढलेल्या वीजेचा भार सहन करू शकत नसल्याने त्या तुटून आग लागत असल्याची बाब टोरंट कंपनीच्या निदर्शनास आली असून अशा घटना टाळण्यासाठी घरातील विद्युत तारा सुस्थितीत आहे की नाही, याची तपासणी करण्याचे आवाहन टोरंट कंपनीने ग्राहकांना करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आला उन्हाळा…घरातील विद्युत तारा तपासा, असेच म्हण्याची वेळ आली आहे.
यंदा उन्हाळा महिनाभरआधीच म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरु झाला आहे. उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानामुळे पंखे, कुलर आणि वातानुकूलीत यंत्रणेचा वापर केला जात असून यामुळे वीजेचा वापरात देखील वाढू लागला आहे. वाढलेल्या वापराचा ताण घरातील विद्युत पुरवठा करीत असलेल्या तारांवर येत आहे. घरातील विद्युत तारा जुन्या झाल्या असतील तर त्या वाढलेल्या वीजेचा भार सहन करीत नाहीत. परिणामी त्या तारा तुटून शार्टसर्कीट होऊन आग लागते.
गेल्या काही वर्षांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाल्याची बाब टोरंट कंपनीच्या निदर्शनास आली असून अशाचप्रकारची घटना नुकतीच विटावा परिसरात घडली आहे. कळवा येथील विटावा परिसरात तळ अधिक चार मजली शिवालय नावाची इमारत आहे. या इमारतीच्या मीटर बाॅक्सच्या केबीनमध्ये शार्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत २२ मीटर जळून खाक झाल्याने नागरिकांचा वीज पुरवठा बंद झाला होता. अशा घटना टाळण्यासाठी टोरंट कंपनीने ग्राहकाना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा >>> कोपर रेल्वे रुळांखालील चोरीच्या जलवाहिन्यांवर कारवाई
काय आहे आवाहन
उन्हाळ्याच्या दिवसात वीजेच्या वाढलेल्या वापराचा ताण घर आणि कार्यालयातील वीज पुरवठा करीत असलेल्या तारांवर येतो. विद्युत तारा जुन्या असतील तर, त्या वाढलेल्या वीजेचा भार सहन करू शकत नाहीत. परिणामी, विद्युत तारा तुटून शॉर्ट सर्किट होण्याची भिती असते. त्यामुळे ग्राहकानी वीज मीटरपासून घर, कार्यालयापर्यंत आलेली विजेची तार तपासून घ्यावी. तसेच घऱातील इतर उपकरणांच्या विद्युत तारांचीही तपासणी करून घेणे आवश्यक आहे. विटावा येथील शिवालय इमारतीमधील मिटर बॉक्सला लागलेल्या आगीत २२ मिटर जळून गेले. ही आग अंतर्गत शॉर्ट सर्किटमुळे लागली. त्यामुळे मीटर बॉक्स आणि घरातील जुन्या धोकादायक झालेल्या विद्युत तारा बदलून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून दुर्घटना टाळता येतील, असे आवाहन टोरंट कंपनीने केले आहे.
वीजेचा वापर
१५०० वॅट क्षमतेची वातानुकूलीत यंत्रणा प्रति दिन किमान ६ तास जर चालवली तर, महिन्याला २७० युनिट वीजेचा वापर होतो. कुलर दिवसातून किमान ८ तास चालवला तर, महिन्याला ४२ युनिटची भर देयकात पडते. गिझरमुळे महिन्याला १०० युनिट वाढू शकतात.