लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : मुख्य गॅस वाहिकेच्या दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने महानगर गॅसकडून डोंबिवली शहराच्या विविध भागाला होणारा महानगर गॅसचा पुरवठा ८ जानेवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ यावेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी एका पूर्व सूचनापत्राव्दारे डोंबिवली एमआयडीसीसह शहराच्या विविध भागातील सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!
Shocking video taking a selfie with a running train puts a boy in danger shocking video
“बाळांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही रे” सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला उभा राहिला, पण मागून मृत्यू धावत आला; थरारक VIDEO
Yashasvi Jaiswal Sledges Sam Konstas Ask Him For Big Shot Video Viral IND vs AUS Sydney Test
IND vs AUS: “ओए कॉन्टास, काय झालं रे..?” यशस्वी जैस्वालने कॉन्स्टासला चिडवलं, चुकीचं नाव घेत अशी घेतली फिरकी; VIDEO व्हायरल
Priyanka Chopra daughter Malti says theek hoon video
प्रियांका चोप्राच्या लेकीचं हिंदी ऐकलंत का? गोंडस मालतीने बाबाजवळ उच्चारला ‘तो’ शब्द, व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?

डोंबिवली शहराच्या बहुतांशी भागात महानगर गॅसकडून वाहिकेव्दारे गॅस पुरवठा केला जात आहे. डोंबिवली एमआयडीसीसह पूर्व शहराच्या भागात महानगर गॅसकडून गॅस पुरवठा केला जातो. डोंबिवली पश्चिमेत अनेक सोसायट्यांना महानगर गॅसकडून गॅस पुरवठ्याच्या वाहिका देण्यात आल्या आहेत. तेथील गॅस पुरवठा अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. महानगर गॅसचे परिचालन आणि देखभाल विभागाचे साहाय्यक व्यवस्थापक आकाश जैन यांच्या स्वाक्षरीची गॅस पुरवठा बंद असल्याची पूर्व सूचनापत्र महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांकडून सोसायटी पदाधिकारी, बंगले मालक, व्यावसायिक यांना देण्यात येत आहेत.

आणखी वाचा-विधानसभेतले बंडखोर पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर?

या पूर्वसूचना पत्रात म्हटले आहे की, मुख्य गॅस पुरवठा वाहिकेच्या देखभाल, दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने ८ जानेवारी रोजी डोंबिवलीचा महानगर गॅसचा पुरवठा सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वेळेत बंद राहणार आहे. मे. जानगिड इंजिनीअर्सतर्फे हे काम केले जाणार आहे. बंदच्या कालावधीत महानगरचा गॅस पुरवठा बंद राहणार आहे. मुख्य गॅस पुरवठा वाहिका देखभाल, दुरुस्तीचे काम जलदगतीने पूर्ण करून विहित वेळेत किंवा त्या अगोदर गॅस पुरवठा सुरू करण्याचे महानगर गॅसचे प्रयत्न असणार आहेत, असे पूर्वसूचना पत्रात म्हटले आहे.या गॅस पुरवठा बंद विषयी अधिक माहितीसाठी महानगर गॅसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दोन वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

आणखी वाचा-ठाण्यात वृक्षांची कत्तल, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

नागरिकांची गैरसोय

८ जानेवारी रोजी महानगरचा गॅस पुरवठा बंद राहणार असल्याने महानगर गॅसचा पुरवठा घरात होणाऱ्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. मागील सात ते आठ वर्षापासून घरात महानगरकडून गॅस पुरवठा होत असल्याने बहुतांशी नागरिकांनी विविध कंपन्यांचे गॅस सिलिंडर एजन्सीला परत केले आहेत. महानगरच्या शेगडीला गॅस सिलिंडरचे नोझल योग्यरितीने बसत नाहीत. त्यामुळे तात्पुरता गॅस सिलिंडर एजन्सीमधून घरी आणून त्याव्दारे स्वयंपाक करण्याची सोय नागरिकांना नाही, असे महानगरचा गॅस पुरवठाधारक ग्राहक राजू नलावडे यांनी सांगितले.

अनेक वर्षांनी अशाप्रकारे महानगरचा गॅस पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना भाजीपोळी केंद्र, हाॅटेल, घरपोच भोजन पुरविणाऱ्या एजन्सीवर नागरिकांना एक दिवस अवलंबून राहावे लागणार आहे. घरात महानगर गॅसचा अखंडा पुरवठा होत असल्याने नागरिकांनी घरात विद्युत शेगडी, स्टोव्ह इतर साधने ठेवलेली नाहीत, असे नलावडे यांनी सांगितले.

Story img Loader