ठाणे – डोंबिवलीचा स्वयंघोषित कथित डोंबिवली किंग इंस्टाग्राम रील स्टार सुरेंद्र पाटील याला अखेर ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. सुरेंद्रचे इंस्टाग्राम या समजमध्यमावर २७६ के इतके फॉलोवर्स आहेत. सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. खंडणी विरोधी पथकाने त्याला नाशिक येथून अटक केली असून त्याला आता पुढील तपासासाठी मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 सु मुंबई विमानतळावर  नोकरीला लावतो असे सांगून त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी आपणास बंदूक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले असा आरोप एका तरुणीने केला आहे. ह्या प्रकरणी पाटील विरोधात गुन्हा दाखल आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यातही एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सुरेंद्रवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

दरम्यान या प्रकरणाचा समांतर तपास खंडणी विरोधी पथकाचे कडून सुरु होता. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि विनायक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या पथकाने नाशिक येथून सुरेंद्र पाटील याला ताब्यात घेतले. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी त्याला मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलिसांनी त्याला अटक केले असून त्याची चौकशी सुरू आहे. 

नाशिक मधील हॉटेलमध्ये बसला होता लपून

– सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर तो नाशिक येथील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. खबऱ्यांनी याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकाला दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

 रियल स्टारची  गुन्हेगारी पार्श्वभूमी

मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या खुर्चीत बसून रील तयार करणे, परवानाधारी बंदुकीचा दुरूपयोग करणे, मोठ्या प्रमाणात पैसे दाखवून त्याची रील्स तयार करणे, अशा काही प्रकरणात सुरेंद्र पाटील यांच्यावर यापूर्वीच मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.