आठवडय़ाची मुलाखत : सुरेश देशमुख, अन्न व औषध विभाग, सहआयुक्त आणि न्यायनिर्णय अधिकारी
अन्नातील भेसळीचे प्रकार हल्ली वाढू लागले असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग वेळोवेळी अन्नपदार्थाच्या तपासण्या करून हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करीत असते, कारण भेसळयुक्त अन्न विषासमान असते. त्यातून विषबाधा होत असते. त्यामुळेच मे महिन्यापासून अन्न व औषध विभागाच्या वतीने अन्न भेसळीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यानिमित्त अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्याशी साधलेला संवाद

* ठाणे जिल्ह्य़ातील अन्नधान्यातील भेसळ रोखण्यासाठी कोणकोणते उपाय योजले आहेत?
उत्पादनाचा दर्जा, दुकानातील तसेच उपाहारगृहातील स्वच्छता पाहिली जाते. अनेकदा अचानक तपासणी करून उपलब्ध अन्नधान्याची गुणवत्ता जोखली जाते. खरे तर अन्नधान्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने वेळोवेळी स्वत:हून त्याची शुद्धता तपासणे गरजेचे आहे. खाद्यतेल उत्पादकाकडे स्वत:ची अद्ययावत प्रयोगशाळा असणे गरजेचे असते. खाद्यतेलाची तपासणी अन्न सुरक्षा मानवाधिकार प्राधिकरण या संस्थेकडून करून घेऊ शकत नाही. अशा वेळी या उत्पादकांची स्वत:ची प्रयोगशाळा आहे का, तपासणीसाठी प्रयोगशाळेत रसायनशास्त्रज्ञ ठेवला आहे का, तसेच वेळोवेळी तपासणी होत आहे का याची खातरजमा केली जाते.

सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
nashik land purchase fraud
नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
tribal students protest nashik
नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन
poor children collected food
‘जेव्हा पोटातली भूक मर्यादा ओलांडते…’ त्यांनी खरकटं अन्न गोळा करून असं काही केलं… VIDEO पाहून व्हाल भावूक

* अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या उत्पादकांनी कोणती काळजी घेणे आवश्यक असते?
उत्पादकांकडून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या पाकिटावर किंवा खाद्यपदार्थाच्या बाटलीवर लेबल असणे अत्यावश्यक असते. त्यावर अन्नपदार्थात कोणकोणते घटक पदार्थ वापरले आहेत, तो पदार्थ कधी बनविला आहे, तसेच तो पदार्थ ग्राहक कधीपर्यंत वापरू शकतात त्याची तारीख, अन्न सुरक्षा मानवाधिकार प्राधिकरण कायद्यांतर्गत देण्यात येणारा परवाना क्रमांक, व्हेज-नॉनव्हेज लोगो, पदार्थाची किंमत, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, वजन या कमीत कमी गोष्टी असणे आवश्यक आहेत.

* अन्नपदार्थाचे नमुने कशा प्रकारे घेतले जातात?
अन्नपदार्थ खाण्यायोग्य आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अन्नपदार्थाचे नमुने घेतले जातात. अन्नपदार्थाचा काही भाग त्यासाठी वापरला जातो. त्यातील काही नमुने सहज तपासणीचा भाग म्हणून उत्पादकाकडून घेतले जातात. जर ग्राहकांनी एखाद्या पदार्थाची तक्रार केली तरीही त्या विशिष्ट पदार्थाचीही तपासणी केली जाते. अगदी ब्रँडेड खाद्यपदार्थाची गुणवत्ताही तपासली जाते. पदार्थ तपासताना संबंधित उत्पादकांना कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही. पदार्थामध्ये काही दोष आढळल्यास शक्य तितक्या लवकर संबंधित उत्पादकावर न्यायालयीन कारवाई केली जाते.

* अन्नपदार्थामध्ये भेसळ आढळल्यास कोणती कारवाई होते?
न्यायपद्धती दोन प्रकारची असून मानवी सेवनास अपायकारक एखादा पदार्थ आढळल्यास किंवा जिवाला धोका असल्यास त्या उत्पादकावर न्यायालयातच खटला चालवला जातो. त्याला कायद्यानुसार न्यायाधीश शिक्षा करतात. मात्र पदार्थ कमी प्रतीचा आहे किंवा उत्पादन प्रक्रियेत सहभागी कामगार प्रशिक्षित नाहीत, अस्वच्छता आहे, अशा काही प्रकारांत अन्न विभागाचे सहआयुक्त तथा न्यायनिर्णय अधिकारी खटला चालवितात. अशा वेळी संबंधित उत्पादकाकडून १ लाखांपासून १० लाख रुपयांपर्यंत दंड वसूल केला जातो. उत्पादक जेव्हा पुन्हा उत्पादन सुरू करतो, त्या वेळी वेळोवेळी तपासणी केली जाते.

* एखाद्या पदार्थाच्या दर्जाबाबत ग्राहकांना शंका असल्यास त्यांनी कुठे तक्रार करावी?
महाराष्ट्र राज्यातील ग्राहकांना एखाद्या पदार्थाविरुद्ध तक्रार करायची असल्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी १८००२२२३६५ हा टोल फ्री नंबर आहे. या नंबरवर २४ तास सेवा दिली जाते. त्यानंतर ज्या जिल्ह्य़ातील विभागातून तक्रार आली आहे, त्या संबंधित जिल्ह्य़ास त्या तक्रारीबद्दल माहिती देण्यात येते. शिवाय ‘एफडीए महाराष्ट्र’ या ईमेल आयडीवर आपली तक्रार नोंदविता येते. तसेच पत्रव्यवहारानेही तक्रार नोंदविली जाते. तक्रारदाराचे नावही गुपित ठेवले जाते. माहिती अधिकारातही ते नाव उघड केले जात नाही.

* गुटखा आणि तंबाखूविरोधात कोणते उपाय योजण्यात आले आहेत?
गुटखा आणि तंबाखू हे पदार्थ महाविद्यालयाच्या आवारात नसावे अशी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी आत्तापर्यंत १६८२ ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. त्यात ११७ ठिकाणी गुटखा, तंबाखू आदींसारखे पदार्थ आढळून आले आहेत. ११६ प्रकरणांत ३२८ गुन्हे दाखल केले आहेत. त्यातून १ कोटी ७८ लाख रुपयांचा मालही आत्तापर्यंत जप्त करण्यात आला आहे.

* या संदर्भात जनजागृतीसाठी काय करता?
ठाणे जिल्हय़ातील महाविद्यालये तसेच अनेक शाळांमधून निबंध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. मे महिन्यापासून ही जनजागृती मोहीम वर्षभर राबविण्याचा मानस आहे. तंबाखू खाण्यामुळे रुग्णांना झालेल्या कर्करोगाची काही छायाचित्रे टाटा कॅन्सर रुग्णालयातून मागविण्यात आली आहेत. या छायाचित्रांचे प्रदर्शन शाळा-महाविद्यालयांत भरविण्यात येणार असून हे पदार्थ खाल्ल्याने काय काय होऊ शकते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल. पथनाटय़ सादरीकरण तसेच दुष्परिणाम दर्शवणारे फलक घेऊन दिंडी काढण्यात येईल.

* शाळांमधून दिल्या जाणाऱ्या खिचडी तसेच दूध या पदार्थावर कसे लक्ष ठेवता?
ताजी बनविलेली खिचडी किंवा वरण-भात विद्यार्थ्यांना खायला द्यावा असे आदेश देण्यात आले असून शाळेच्या उपाहारगृहात स्वच्छता आहे की नाही हे तपासण्यासाठी वेळोवेळी अचानक भेट दिली जाते. शाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या पदार्थावरही लक्ष दिले जाते. शिवाय वनवासी शाळेमध्ये बनविण्यात येणाऱ्या भाज्या तसेच इतर पदार्थाच्या साठवणुकीवरही सतत लक्ष ठेवले जाते.

* सणांच्या काळात मावा किंवा मिठाईच्या दुकानांवर कारवाई केली जाते, तशी इतर वेळी का केली जात नाही?
प्रत्येक महिन्यात विशिष्ट खाद्यपदार्थाचा वापर आपण जेवणात करत असतो. सध्या उन्हाळ्याच्या काळात काही जण हातगाडय़ा लावून सर्रास बर्फाचे गोळे तसेच पन्हे, कोकम सरबत, लिंबू सरबत आदींची विक्री करताना दिसतात. अशा वेळी सरबत तसेच गोळ्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ कुठून आणला आहे, याची खात्री करतो. तसेच सणांच्या काळात मावा तसेच गोडच्या पदार्थाची मागणी वाढलेली असते. अशा वेळी भेसळ होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे प्रत्येक मोसमात वेगवेगळ्या पदार्थावर कारवाई होत असते. सध्या सकाळी मार्निग वॉक करताना दुधी, कारले आदी पदार्थाचा रस पिण्याचे प्रमाण वाढले आहे. या रसामुळे अनेक वेळा विषबाधा झाल्याचे प्रकार आढळून येतात.

* हॉटेल व्यावसायिकांची श्रेणी कशी ठरविता?
त्या त्या भागातील महापालिका प्रशासन श्रेणी ठरवते. मात्र परवाने देण्याचे काम अन्न विभागाचे असून ते देण्याआधी हॉटेलच्या स्वयंपाकघराची स्वच्छता तसेच पदार्थामध्ये वापरण्यात येणाऱ्या जिन्नसाची तपासणी केली जाते. त्यानंतरच हे परवाने दिले जातात. शिवाय ही तपासणी जोपर्यंत हॉटेल सुरू आहे, तोपर्यंत वेळोवेळी केली जाते.

* उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा एकंदरीतच खाद्यपदार्थाबाबत ग्राहकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी?
शिळे अन्न खाणे टाळावे. तसेच कलिंगडासारखी गारवा देणारी फळे विकत घेताना कापून घेऊन थोडी चव चाखावी. ताज्या फळांचे रस अधिक प्रमाणात घ्यावे. काही अपायकारक जाणवल्यास अन्न प्रशासन विभागात त्वरित तक्रार नोंदवावी.

 

भाग्यश्री प्रधान

Story img Loader