बांधकामधारकांना नोटिसा
कल्याण– पावसाळ्यातील साथीचे आजार नियंत्रणासाठी जूनपासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने तीन लाख घरांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून आढळून आलेल्या विविध प्रकारच्या साथ आजारातील रुग्णांना तातडीने उपचार करुन दिले. बांधकामाच्या ठिकाणी स्वच्छता न ठेवणाऱ्या ३० हून अधिक विकासकांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथ रोग नियंत्रण अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.
हेही वाचा >>> घोडबंदर भागात वाहन बंद पडल्याने गायमुख ते नवघर पर्यंत वाहतूक कोंडी
पावसाळा सुरू झाल्यानंतर निर्माण होणारे साथ आजार नियंत्रणासाठी पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना तत्पर वैद्यकीय सेवा मिळेल, अशी सुविधा केली आहे. पालिका हद्दीतील खासगी दवाखने, खासगी रुग्णालयांना साथ आजाराशी संबंधित रुग्णांची माहिती तातडीने वैद्यकीय आरोग्य विभागाला कळविण्याचे सूचित केले होते. खासगी रुग्णालयांमधून रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णाच्या घरी जाऊन सदस्यांची आरोग्य चाचणी, त्या घर परिसरात स्वच्छता, धूरफवारणी करण्याची कामे प्रभावीपणे केली, अशी माहिती डाॅ. पानपाटील यांनी दिली.
विकासकांना नोटिसा
पालिका हद्दीत अनेक भागात विकासकांकडून बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांच्या ठिकाणी पाण्यासाठी, बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये काही ठिकाणी साथ आजार पसरविणारे डास आढळून आले. त्यामुळे विकासकांना या खोदलेल्या खड्ड्यांच्या विषयी तात्काळ आवश्यक कारवाई करण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत. प्रत्येक मजुर, त्याच्या कुटुंबीयांची नियमित आरोग्य तपासणी जवळच्या आरोग्य केंद्रात करण्याच्या सूचना केल्या आहेत. तशा नोंदींची सक्ती केली आहे. बांधकामाच्या ठिकाणी घाण, दुर्गंधी ठेवणाऱ्या विकासकांना घनकचरा विभागाच्या माध्यमातून नोटिसा दिल्या आहेत.
हेही वाचा >>> शहापूर: धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू
बंद बांधकामांचा प्रश्न
शहराच्या अनेक भागात काही इमारत बांधकामे रखडलेल्या स्थितीत आहेत. तेथे कोणीही मालक, मजूर दिसत नाही. अशा ठिकाणी घाण पडलेली आहे. अशा बंद कामाच्या ठिकाणचा कचरा, टाकाऊ बांधकाम सामुग्री उचलून तेथे स्वच्छता ठेवण्याचे काम घनकचरा विभागाच्या माध्यमातून केले जाते. शिळफाटा रस्ते हद्दीत निर्माणाधीन असलेल्या गृहप्रकल्पांना अचानक भेटी देऊन बांधकामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवली जाते का. मजुरांची नियमित आरोग्य तपासणी विकासकांकडून केली जाते का, याची तपासणी केली आहे, अशी माहिती डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.
तीन महिन्यातील साथीचे रुग्ण
तापाचे रुग्ण १२ हजार, टायफाईड १०१, गॅस्ट्रो ५४, कावीळ ३८, डेंग्यु ५८, लेप्टो १२, मलेरिया ३०, डोळे येणे ५१९, एच३एन२-९.
तीन महिन्यात १२ लोकसंख्येची आरोग्य तपासणी करण्यात आली. सात हजार रहिवाशांचे रक्त नमुने तपासले. ५०० ठिकाणाचे पाणी नमुने तपासले. जनजागृतीसाठी सव्वा दोन लाख साथ आजारांची माहिती देणारी पत्रके विविध भागात वाटप करण्यात आली.
“ पावसाळा सुरू झाल्यानंतर उद्भवणाऱ्या साथ आजारांचा विचार करुन आरोग्य केंद्रात तत्पर वैद्यकीय सुविधा मिळतील अशी व्यवस्था केली. प्रभागांमध्ये धूर, जंतूनाशक फवारणी नियमित केली जाते. बांधकामांच्या ठिकाणच्या अस्वच्छतेमुळे मजुरांना बाधा होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.” डॉ. प्रतिभा पानपाटील- साथ रोग नियंत्रण अधिकारी.