शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने ठाण्यात दिवाळी पहाट निमित्ताने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली. यावेळी अंधारेंनी शिंदे गटाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण करून दिली. त्यांनी रविवारी (१२ नोव्हेंबर) एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही प्रतिक्रिया दिली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पंडीत बिस्मिल्ला साहेबांची सनई, पंडीत भीमसेन जोशी यांची भक्तीगीते किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळं ऐकून होतो. आज ठाण्यामध्ये उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनाच काय, अवघ्या महाराष्ट्रालाही अपेक्षित नसेल.”

shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
Eknath shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
eknath shinde and popat dhotre friendship news
‘लाडक्या मित्रा’च्या भेटीसाठी कायपण! एकनाथ शिंदे-पोपट धोत्रे यांच्या कान्हूरमधील मैत्रीची चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर गौतमीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ठाणेकरांचं प्रेम कसं वाटलं? असा प्रश्न विचारला असता गौतमी पाटीलने खास उत्तर दिलं आहे. तिने स्मितहास्य करत “एक नंबर” असं उत्तर दिलं आहे.

“मुंबईचे प्रेक्षक मला खूप आवडतात”

ठाण्यातील कार्यक्रमाबद्दल विचारलं असता गौतमी पाटील पुढे म्हणाली, “मला खूप छान वाटलं, मी नेहमी म्हणत असते की, मुंबईचे प्रेक्षक मला खूप आवडतात. मला नेहमी त्यांचं प्रेम मिळतं. सगळेजण पाच-सहा वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी येऊन थांबले होते. त्यामुळे खूप छान वाटलं. तुम्हाला आणि सर्व प्रेक्षक वर्गाला, महिला वर्गाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.”

हेही वाचा : “शाखा पाडली, बॅनर्स फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडतो”, मुंब्र्यात उद्धव ठाकरे कडाडले

दरम्यान, ठाण्यातील तलाव पाळी येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा खास शो ठेवण्यात आला होता. याबाबत स्वतः गौतमी पाटीलने माहिती दिली. तिने शेअर केलेल्या स्टोरीतील पोस्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे. तसेच ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचाही फोटो आहे. गौतमीचा कार्यक्रम लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाला. “लवकरच ठाण्यात” असं गौतमीच्या स्टोरीतील पोस्टमध्ये लिहिलं होतं.

Story img Loader