डोंबिवली: राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने डोंबिवलीत कायद्याचे शिक्षण देणारे विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. ६० विद्यार्थ्यांची क्षमता असणारे हे कल्याण, डोंबिवली परिसरातील पहिले विधी महाविद्यालय आहे.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील स्वामी विवेकानंद शाळेच्या इमारतीत हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयाचे उद्घाटन बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. रवींद्र कुलकर्णी, संस्था अध्यक्ष संजय कुलकर्णी, कार्यवाह शिरीष फडके यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्र शासन, भारतीय विधिज्ञ परिषद यांच्या मान्यतेने विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणार आहे.

laxmi vilas palace gujarat
Laxmi Vilas Palace: मराठी राजाने बांधलेला जगातील सर्वात मोठा राजवाडा गुजरातमध्ये; जाणून घ्या इतिहास
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर… चार देशांत होणार विद्यापीठाचे केंद्र
World heritage site
जागतिक वारसा स्थळे कशी निवडली जातात? घ्या जाणून…
political twist in the suicide of a professional DJ
बीड, नगर जिल्ह्यात दरोडा घालणारे गजाआड, गु्न्हे शाखेची कारवाई
Leaders do not come to ask for votes banners at Pangul Colony in Nagpur
नेत्यांनो, मत मागायला येऊ नका! नागपुरातील पांगूळ वसाहतीत फलक
Pune shaharbat Competitive Examination in years A scholar Security audit Pune print news
शहरबात: अभ्यासिकांचा सुळसुळाट… सुरक्षिततेचे काय?
Enrol in a training institute and get a free tablet lure to students from institutes
“प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्या अन् मोफत ‘टॅबलेट’ मिळवा”, संस्थांकडून विद्यार्थ्यांना आमिष

डोंबिवली परिसरात एक तरी विधी महाविद्यालय असावे यासाठी मागील १५ वर्षापासून आपण विचार करत होतो. डोंबिवलीतील ज्येष्ठ वकील दिवंगत शशिकांत ठोसर आपणास नेहमी या महाविद्यालयासाठी प्रयत्न करण्याचे सूचित करायचे. त्यावेळी सत्तास्थानी नसल्याने अनेक वेळा प्रयत्न करूनही शेवटच्या क्षणी परवानगी नाकारली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना तेव्हापासून आपले डोंबिवलीतील विधी महाविद्यालयासाठी प्रयत्न सुरू होते. राष्ट्रीय शिक्षण संस्थेने यासाठी पुढाकार घेतला होता. डोंबिवलीत विधी महाविद्यालय किती महत्वाचे हे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगितले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर महाविद्यालयाच्या प्रस्ताव गेल्यानंतर त्यांनी तात्काळ हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे हे महाविद्यालय डोंबिवलीत सुरू झाले, अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा… ठाणे: ओएलएक्स ॲपवर टेम्पो विक्री महागात पडली; मालवाहतुकदाराची फसवणूक

कल्याण न्यायालय सुविधांच्या बाबतीत गैरसोयीचे झाले आहे. वकिल, आशिलांची संख्या वाढतेय त्याप्रमाणात न्यायालयाच्या वास्तुत पुरेशा सुविधा नाहीत. वकील, आशिलांना न्यायालय आवारात वाहने उभी करण्यास पुरेशी जागा नाही. अशीच परिस्थिती भिवंडी न्यायालयाची आहे. राज्याच्या विविध भागातील ६४ ठिकाणी नव्याने न्यायालये उभी राहत आहेत. कल्याण न्यायालयाची इमारत आपण वरील आणि भूस्तरावर वाढू शकत नाही. सार्वजनिक बांधकाम खाते आपणाकडे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याण न्यायालयाच्या विस्तारासाठी अनुकूल आहेत. तेव्हा कल्याण न्यायालयातील वकिलांनी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव दिला तर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे आश्वास मंत्री चव्हाण यांनी उपस्थित वकील संघटनेच्या पदाधिकऱ्यांना दिले.

हेही वाचा… बदलापुरातील दिव्यांनी उजळणार परदेशातील दिवाळी; ‘या’ आखाती देशात लाखो पणत्या रवाना

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखा शिक्षण पध्दती आहे. त्यामुळे वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कायद्याच्या अभ्यासा बरोबर डिजिटल, कृत्रिम बुध्दिमत्तेचे शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वामी विवेकानंद यांच्या नावाने चालणाऱ्या या संस्थेत नक्कीच विद्यार्थ्यांना सचोटीचे धडे मिळतील. कायद्याचे ज्ञान घेऊन बाहेर पडलेले या महाविद्यालयातील विद्यार्थी ताठ बाण्याने समाजाचे, अन्याय-अत्याचाराचे, शहर हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतील,’ असा विश्वास कुलगुरू डाॅ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

डोंबिवलीत व्यवस्थापन, क्रीडा, कला महाविद्यालय सुरू करण्याची गरज आहे, असे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी सांगितले. विनाअडथळा मंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नाने या महाविद्यालयाला परवानगी मिळाल्याचे, प्रवेश पूर्ण झाल्याचे अध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई यांनी केले.