ठाणे : शहर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशाच ठाणे महापालिकेतील ११ गुणवंत सफाई कामगारांचा आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी सत्कार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील महत्त्वाच्या सरकारी इमारती, महापालिका भवन, गडकरी रंगायतन, पादचारी पूल, उड्डाणपूल या ठिकाणांवर रोषणाईही करण्यात आली होती. पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

हेही वाचा – लोकलमध्ये मरण पावलेल्या प्रवाशाचा शर्टावरील शिंप्याच्या खुणेवरून शोध

या ध्वजारोहणानंतर आयुक्त बांगर यांच्या हस्ते गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. त्यात मनीषा शशिकांत साळवे, कमलाकर लक्ष्मण शिंदे, हरिश्चंद्र परेश चोरघे, विमल दत्तात्रय केदारे, मंजूळा शंकर राठोड, विजय राजपाल पारचा, सलीम नुसरत खान, शांता वसंत राठोड, दिपक गोविंद सकपाळ, रमा रमेश सोलंकी, धनंजय शांताराम भाेईर या कामगारांचा समावेश आहे. या सर्वांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.