ठाणे शहरात श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने मराठी नववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेला ‘मी ठाणेकर आणि ही माझी यात्रा’अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. या टॅगलाईन मुळे यंदाच्या यात्रेत ठाणेकरांचा सहभाग वाढावा अशी भावना आयोजकांची आहे. तसेच यंदाच्या यात्रेत लेझीम पथक आणि अहिल्यादेवी होळकर यांचा चरित्र रथ नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी नववर्षे म्हणजेच गुढीपाडव्या दिवशी ठाणे शहरात श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने भव्य स्वरुपात स्वागत यात्रा काढली जाते. दरवर्षी ही यात्रा वेगवेगळ्या विषयांवर आधारित काढली जाते. यंदा या यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्षे असून आयोजकांनी चार महिन्या आधीपासून तयारीला सुरुवात केली आहे. या रौप्य महोत्सवी वर्षात यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी यंदाच्या यात्रेला ‘मी ठाणेकर आणि ही माझी यात्रा’अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. या टॅगालाईन संदर्भातील घोषणा न्यासने सोमवारच्या बैठकीत केली. या बैठकीला शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी नेहमीच्या संस्थांसह तीन ते चार नव्या संस्था स्वागत यात्रेशी जोडल्या असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच या बैठकीत सहभागी झालेल्या काही संस्थांनी ते कोणत्या विषयावर चित्ररथ साकारणार आहे याविषयी सांगितले. यात, क्रीडा भारती संस्थेच्या वतीने तरुणांना आकर्षित करण्यासाठी शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांचे लेझीम पथकाचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले. यासाठी त्यांनी विविध महाविद्यालयांना आवाहन केले असून त्या विद्यार्थ्यांना लेझीमचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त अहिल्यादेवींचे चरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आयोजकांचा उद्देश आहे.

अहिलायदेवी होळकर त्रीवर्षीय समितीच्या वतीने स्वागत यात्रेत अहिल्यादेवी होळकर यांचा चरित्ररथ साकारण्यात येणार आहे. तसेत इतर संस्थांचे नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या स्वागत यात्रेत नागरिकांची संख्या वाढावी यासाठी आपल्या आजूबाजूच्या सोसायटीतील नागरिकांना सोसायटीच्या बॅनरसह पारंपारिक वेशभुषेत यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करा, असे संस्थांच्या प्रतिनिधीना आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.