ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा भार ठाणे रेल्वे स्थानक पेलू शकत नसल्याने मंजूर झालेले प्रकल्प सुरू करा. एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकासारखी पूनरावृत्ती टाळण्यासाठी  कल्याण दिशेस असलेला पादचारी पुल सॅटिसला जोडण्यात यावा अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

ठाणे रेल्वे स्थानकात यापूर्वी एकूण सात पादचारी पुलांपैकी दोन पादचारी पुल नव्याने बांधण्याकरिता तोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना ये-जा करण्यासाठी फक्त पाच पादचारी पूल आहेत. त्यापैकी तीन पादचारी पूलांवर प्रवाशांचा सर्वाधिक भार असतो. यासंदर्भाचे वृत्त शुक्रवारी लोकसत्ता ठाणे सहदैनिकात ‘ठाणे स्थानकात प्रवाशांची कोंडी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनीही कल्याण दिशेस असलेला पादचारी पुल सॅटिसला जोडण्यात यावा अशी मागणी रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक नरेश लालवाणी व मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

pune vehicle vandalized news in marathi
Video : बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाची धिंड
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Elphinstone Road Over Bridge
Elphinstone Bridge: मुंबईतील १२५ वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल पाडला जाणार; वाहतूक कोंडीमुळे हाल होणार?
dilapidated, bridge, Mumbai, traffic ,
मुंबईतील आणखी एक पूल जीर्ण, पुनर्बांधणीसाठी वाहतूक बंद
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
reconstruction of Bridge located between Mahim and Bandra stations successfully completed
माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण

हेही वाचा >>> रस्ते कामांचे लेखापरिक्षणानंतरच कंत्राटदारांना देयके द्या; ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

 ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे महापालिकेने मंजूर केलेल्या २४ कोटी रुपये निधीतून पादचारी पुलाचे काम रेल्वे मार्फत सुरू आहे. त्यापैकी महापालिकेने ८ कोटी निधी रेल्वे प्रशासनाकडे वर्ग केला आहे आणि पुढील निधी प्राप्त होण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. परंतु  निधीअभावी काम थांबवू नका या पुलावरून रेल्वे प्रवासी ये-जा करणार आहेत. त्यामुळे जबाबदारी ढकलू नका. या पुलावर गर्डरचे काम तात्काळ सुरू करा अशी मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

हेही वाचा >>> कापूरबावडी, माजीवडा चौकातील कोंडी फोडण्यासाठी चक्राकार पद्धतीने नियोजन; लवकरच ‘हे’ बदल केले जाणार

तसेच दिवसेंदिवस ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी वाढत असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील एलफिस्टन रोड स्थानकातील घटनेची पुनरावृत्ती ठाणे रेल्वे स्थानकात होऊ नये याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी व तात्काळ उपायोजना करावी असे म्हटले आहे. रेल्वे प्रशासनानेही याची दखल घेऊन काम सुरू करू असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले आहे. विचारे यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क करून ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरील गर्दीचे छायाचित्रही पाठविले आहेत.

Story img Loader