ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा भार ठाणे रेल्वे स्थानक पेलू शकत नसल्याने मंजूर झालेले प्रकल्प सुरू करा. एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकासारखी पूनरावृत्ती टाळण्यासाठी कल्याण दिशेस असलेला पादचारी पुल सॅटिसला जोडण्यात यावा अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.
ठाणे रेल्वे स्थानकात यापूर्वी एकूण सात पादचारी पुलांपैकी दोन पादचारी पुल नव्याने बांधण्याकरिता तोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना ये-जा करण्यासाठी फक्त पाच पादचारी पूल आहेत. त्यापैकी तीन पादचारी पूलांवर प्रवाशांचा सर्वाधिक भार असतो. यासंदर्भाचे वृत्त शुक्रवारी लोकसत्ता ठाणे सहदैनिकात ‘ठाणे स्थानकात प्रवाशांची कोंडी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनीही कल्याण दिशेस असलेला पादचारी पुल सॅटिसला जोडण्यात यावा अशी मागणी रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक नरेश लालवाणी व मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे महापालिकेने मंजूर केलेल्या २४ कोटी रुपये निधीतून पादचारी पुलाचे काम रेल्वे मार्फत सुरू आहे. त्यापैकी महापालिकेने ८ कोटी निधी रेल्वे प्रशासनाकडे वर्ग केला आहे आणि पुढील निधी प्राप्त होण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. परंतु निधीअभावी काम थांबवू नका या पुलावरून रेल्वे प्रवासी ये-जा करणार आहेत. त्यामुळे जबाबदारी ढकलू नका. या पुलावर गर्डरचे काम तात्काळ सुरू करा अशी मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
तसेच दिवसेंदिवस ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी वाढत असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील एलफिस्टन रोड स्थानकातील घटनेची पुनरावृत्ती ठाणे रेल्वे स्थानकात होऊ नये याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी व तात्काळ उपायोजना करावी असे म्हटले आहे. रेल्वे प्रशासनानेही याची दखल घेऊन काम सुरू करू असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले आहे. विचारे यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क करून ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरील गर्दीचे छायाचित्रही पाठविले आहेत.