लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: कल्याण पूर्व भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त होत चालले आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. कल्याण पूर्व भागातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, अशी मागणी कल्याण पूर्व भागातील नागरिकांनी गुरुवारी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन केली.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?

या भेटीत सामान्य महिला वर्गाची संख्या सर्वाधिक होती. गेल्या काही दिवसापूर्वीच कल्याण पूर्व भागात एका गुन्हेगाराने एका अल्पवयीन मुलीला दिवसा रस्त्यात अडवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. दोन अन्य घटनांमध्ये कोयत्याचा वार करुन दोन जणांना गंभीर जखमी करण्यात आले होते.

आणखी वाचा-डोंबिवली : घरडा सर्कल येथील खडीचा रस्ता बांधकाम विभागाकडून साफ

बुधवारी रात्री एका अल्पवयीन मुलीला तिच्या घराच्या दारात एक तरुणाने निर्घृणपणे हल्ला करुन ठार मारले. या घटनांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा दुर्देवी घटना वाढत आहेत, असे नागरिकांनी उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आणखी वाचा- ठाणे, पालघरमधील लोकसभेच्या चारही जागा मनसे लढणार

माजी नगरसेवक महेश गायकवाड, नीलेश शिंदे, सुशीला माळी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. कल्याण पूर्व भागातील बहुतांशी पोलीस चौक्या बंद आहेत. त्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात. पूर्व भागातील पोलिसांची गस्त वाढवावी. पोलीस मित्र संकल्पना पुन्हा सुरू करण्यात यावी. शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी. निर्जन स्थळी काही तरुण तरुणी फिरण्यासाठी जातात. तेथे काही गैरप्रकार होतात. अशी निर्जन ठिकाणे शोधून तेथे गस्ती पथकाच्या फेऱ्या वाढवाव्यात अशा मागण्या नागरिकांकडून उपायुक्तांना करण्यात आल्या.