लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: वडपे-ठाणे महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात. या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्यास तातडीने या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी सायंकाळी वडपे – ठाणे महामार्गाच्या डांबरी रस्त्याचे आठ पदरी काँक्रिटीकरण करण्याच्या कामांची पाहणी केली. तसेच यावेळी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ पोलीस, परिवहन, महामार्ग पोलीस सर्व यंत्रणांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !

ठाणे ठाणे शहरातील विविध रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे शहरांतर्गत शहराच्या बाहेरून जाणाऱ्या वाहनांच्या मार्गावर पावसाळा सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नित्याच्या या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना अवघ्या काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठी काही तास तात्कळत राहावे लागत असल्याचे अनेकदा दिसून येत आहे. यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांबाबत वाहन चालकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.

आणखी वाचा-वालधुनी किनाऱ्यावरचे बांधकाम हटवले; भूमाफियांनी उभारले होते १२ गाळे, गुन्हा दाखल

याच पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी आज शहरासाठी महत्वाच्या असणाऱ्या वडपे-ठाणे महामार्गाची पाहणी केली. या डांबरी रस्त्याचे सध्या आठ पदरी कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कमाचीही भुसे यांनी यावेळी पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, पोलीस, परिवहन, महामार्ग पोलीस सर्व यंत्रणांची बैठक घेऊन आढावा घेतला.

पावसाळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, रहदारी सुरळीत राहिल, यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात. तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. जिल्हा व ठाणे शहर वाहतूक पोलीसांच्या मदतीसाठी तातडीने वॉर्डन नेमण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. याच बरोबर वडपे ते खारेगाव नाका या मार्गाची पाहणी केली. वडपे-ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस विभाग व एमएसआरडीए यांनी एकत्रितपणे नियोजन करावे. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे, अशा ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमून तातडीने वाहतूक कोंडी सोडविण्यात यावी. यासाठी एमएसआरडीएने पोलीसांना ट्रॅफिक वॉर्डन पुरवावेत. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यामुळे कोंडी होत असल्यास तेथील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. एखादे वाहन रस्त्यावर बंद पडल्यास तातडीने दूर करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना भुसे यांनी यावेळी केल्या.

आणखी वाचा-पालिका अभियंते, ठेकेदार गायब, डोंबिवली-कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांकडून खड्डे भरणीची कामे

या बैठकीला पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील, यांच्यासह रस्त्याचे कंत्राटदार व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

भिवंडी तालुक्यातील मौजे पडघा खडावली फाट्याजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातातील तीन जखमींना भिवंडीतील मायरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी सायंकाळी रुग्णालयात जाऊन या जखमींची विचारपूस केली.

Story img Loader