ठाणे : एकीकडे ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयक थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत असतानाच, दुसरीकडे अशा थकबाकीदारांवर पालिकेकडून कर सवलतींचा वर्षाव केला जात असल्याचे चित्र आहे. पाणी देयकांच्या थकबाकीदारांसाठी पालिकेकडून अभय योजना लागू केली असून त्यामध्ये थकीत देयकावरील प्रशासकीय आकारात शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये पाणी पुरवठा विभागाला पाणी देयकांच्या वसुलीतून २३५ कोटींचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. असे असले तरी चालू वर्षांच्या देयकांची रक्कम १४८ कोटी रुपये इतकी आहे तर, ७६ कोटी रुपये ही थकबाकी आहे. एकूण देयकांच्या रकमेपैकी आतापर्यंत १०६ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. या देयकांच्या वसुलीसाठी पालिकेने थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई सुरू केली आहे. असे असले तरी दुसरीकडे पाणी देयकांच्या थकबाकीदारांसाठी पालिकेकडून अभय योजना लागू केली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ जोडण्या देण्यात आलेल्या असून या नळजोडणीधारकांनी थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केला तर, त्यांना प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू असणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती नळ जोडणीधारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना हि सवलत योजना लागू असणार नाही. तसेच, ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.