ठाणे : दहावीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक योगेश अहिरे (४८) याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे.कळवा येथे एका शाळेत योगेश अहिरे हे चित्रकला विषय शिकवितात. ९ सप्टेंबरला पिडीत मुलगी शिक्षक कक्षात गेली असता, योगेश अहिरे याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर पिडीत मुलगी रडत वर्गात आली. घडलेला प्रकार तिने वर्ग मैत्रिणींना तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी अहिरे यांची चौकशी केली.
तसेच पिडीत मुलगी घरी गेल्यानंतर तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना घटनेची माहिती दिली. मंगळवारी अविनाश जाधव हे कार्यकर्त्यांसह शाळेत गेले. तसेच त्यांनी अहिरे आणि मुख्याध्यापकांना या कृत्याबाबत जाब विचारला. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून योगशे अहिरे याला अटक केली