कल्याण– वर्गात मस्ती करतो म्हणून येथील रामबाग विभागातील आदर्श हिंदी शाळेतील अशोक तिवारी या शिक्षकाने एका पाच वर्षाच्या विद्यार्थ्याला छडी आणि हाताने बेदम मारहाण केली. विद्यार्थ्याला दुखापत झाल्याने त्याला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलाचे वडील रमेश थापा यांना ही माहिती मिळताच त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शिक्षक तिवारी यांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. शिक्षकाच्या या वर्तनाने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : बहुमताची चाचणी केली तर १६४ चे संख्याबळ १८४ होईल – बावनकुळे

चिकणघर भागात थापा कुटुंबीय राहते. त्यांचा मुलगा निरंजन थापा हा आदर्श हिंदी विद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवारी तो शाळेत एका सहकारी मुलाबरोबर मस्ती करत होता. हा प्रकार तिवारी यांना सहन झाला नाही. त्यांनी निरंजनला छडी आणि हाताने बेदम मारहाण केली. घरी गेल्यानंतर निरंजनने घडला प्रकार वडिलांना सांगितला. निरंजनच्या हात, पाय आणि तोंडावर मारहाणीचे व्रण उठले आहेत. शिस्त लागण्यासाठी शिक्षकांनी कठोर राहावे पण त्यासाठी बेदम मारहाण हा त्यावरचा उपाय नाही, असे पालकांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher brutally thrashes 5 year old student with stick in classroom zws