ठाणे : ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करून दोन वेगवेगळ्या प्रकरणात १० लाख रुपयांहून अधिकच्या किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

मुंब्रा येथील खर्डीगाव परिसरात गुन्हे अन्वेषण शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्राॅन (एमडी) हे अमली पदार्थ बाळगणाऱ्या मोहम्मद अब्दुल रेहमान सय्यद याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे ६० ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ आढळून आला. मोहम्मद विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हे अमली पदार्थ ७ लाख ४३ हजार २२० रुपयांचा असून त्याने तो कुठून आणला याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा…कल्याण पूर्वेत किरकोळ कारणावरून तरूणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

तर दुसरे प्रकरण डायघर भागात उघडकीस आले आहे. नवाज पावले याच्याकडे पोलिसांना ३ लाख ६३ हजार रुपये किममीचे कफ सिरफ हे अमली पदार्थ आढळून आले. याप्रकरणी शीळ- डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Story img Loader