ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आज (बुधवार) सकाळी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यातच ठाणे स्थानकात लोकलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, तांत्रिक बिघाड झालेली लोकल काही मिनिटांमध्ये सुरू झाली. मात्र प्रवाशांना स्थानकावर उतरवून लोकल कारशेडमध्ये पाठविण्यात आली.

मुंबई : सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; अनेक ठिकाणचे सखलभाग जलमय

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ४ वरून सीएसटीएम स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि लोकल खोळंबली. ही लोकल १० ते १५ मिनिटांनी सुरू झाली. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी सावधगिरीची उपाययोजना म्हणून लोकलमधून प्रवाशांना उतरविले आणि लोकल कारशेडमध्ये रवाना झाली. मात्र यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

साचलेल्या पाण्यामुळे १० बसगाड्या बिघडल्या –

मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणाऱ्या बेस्टच्या १० बसगाड्या बंद पडल्या. यापैकी आठ बसगाड्या दुरुस्त करण्यात यश आले. मात्र बसगाड्या बंद पडल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Story img Loader