Karjat News : कर्जत या ठिकाणी मध्य रेल्वेचं काम सुरु होतं. मात्र तांत्रिक बिघाड झाल्याने अप आणि डाऊन लोकल्सची वाहतूक खोळंबली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ऑफिस गाठणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत. कर्जत या ठिकाणी एका ओ एच इ वायर खांबाला धक्का लागला,
हा खांब ठीक करेपर्यंत अर्धा तास गेला. त्यामुळे सगळा खोळंबा झाला आहे. कर्जतहून सुटणाऱ्या चार लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकी काय घटना घडली?

कर्जत स्टेशन या ठिकाणी ब्लॉक सुरु असताना एका ओ एच इ वायर खांबाला धक्का लागला. खांब दुरुस्त करेपर्यंत साधारण अर्धा ते पाऊण तास गेला. सकाळी ७ वाजेपर्यंत हे काम सुरु होतं. त्यामुळे कर्जतहून सुटणाऱ्या चार लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या. कर्जत या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना कल्याण, डोंबिवली आणि या मार्गावरील स्टेशन्सवर करण्यात येते आहे. तसंच या बिघाडामुळे काही एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूकही उशिराने होते आहे.

मुंबई ट्रेन अपडेट्स या फेसबुक ग्रुपवरही माहिती

कर्जत या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मुंबई ट्रेन अपडेट्स या फेसबुक ग्रुपचे अॅडमिन मंदार अभ्यंकर यांनीही पोस्ट केली आहे. तसंच एक तास हा खोळंबा झाला होता असंही त्यांनी म्हटलं आहे. मध्य रेल्वेची वाहतूक कालही उशिराने होती आणि आजही उशिराने आहे असं प्रवासी म्हणत आहेत. कर्जतहून दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठणाऱ्या अनेक मुंबईकरांचा आज लेटमार्क लागणार यात काहीही शंकाच नाही.