कंपनी व्यवस्थापन आणि श्रमिक सेना युनियनमध्ये करारावर शिक्कामोर्तब

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुरबाड येथील टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीचा करार नुकताच करण्यात आला असून या करारानुसार कामगारांना पुढील चार वर्षांत सहा हजार चारशे रुपयांची वाढ मिळणार आहे. तसेच कामगारांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय मदत म्हणून वर्षांला ७५ हजार रुपयांची मेडिक्लेम सुविधा मिळणार असून त्याचा दरमहा पाचशे रुपयांचा हप्ता कंपनी भरणार आहे. याशिवाय, कामगारांना यंदाच्या वर्षांपासून रक्षाबंधनाचीही सुट्टी मिळणार आहे.

मुरबाड येथील मे. टेक्नोक्राप्ट इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी असून राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी स्थापन केलेली श्रमिक सेना ही युनियन कंपनीतील कामगारांचे प्रतिनिधित्व करते. या कंपनीत श्रमिक सेनेचे १७५ सभासद असून कामगारांच्या पगारात वाढ करण्याची मागणी युनियनकडून सातत्याने सुरू होती.या पाश्र्वभूमीवर व्यवस्थापन आणि युनियन अध्यक्ष व पदाधिकारी यांची एक बैठक नुकतीच पार पडली. त्यात कामगारांच्या पगारवाढीसंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या करताना  २०१५ ते २०१९ या चार वर्षांसाठीचा करार केला गेल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

करारातील महत्त्वाच्या तरतुदी

पुढील चार वर्षांकरिता सहा हजार चारशे रुपये वाढवून मिळणार आहेत. तसेच महागाई भत्त्याच्या रकमेपोटी कामगारांना दर वर्षांला रुपये पाचशे ते सहाशे रुपये मिळणार आहेत. कामगारांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय मदत म्हणून वर्षांला ७५ हजार रुपयांचा आरोग्य विमा सुविधा मिळणार आहे. त्याचा दरमहा पाचशे रुपयांचा हप्ता कंपनी भरणार आहे. तसेच कामगारांना रक्षाबंधनाची सुट्टी वाढवून देण्यात आली आहे. पगारवाढीतील एक हजार सहाशे रुपये, महागाई भत्ता पाचशे रुपये, आरोग्य विमाचे पाचशे रुपये व भरपगारी सुट्टीमुळे चारशे रुपये असे एकूण दर वर्षांला तीन हजार रुपये व चार वर्षांकरिता एकूण १२ हजार रुपयांची पगारात वाढ होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technocraft industries workers get salary increment