शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वातावरणात मोठे बदल झाले असून ठाणे शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. मात्र, गुरुवारी त्यात वाढ होऊन शहराचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. शुक्रवारी शहरात ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णतेची दाहकता जाणवत असून नागरिकांच्या अगांची काहीली होऊ लागली आहे. तसेच बदललेल्या वातावरणामुळे आजारपण वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> शिंदे गटाला मनसे रसद?; शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी हालचाली

ठाणे महापालिका क्षेत्रात मार्च महिन्यात तापमानाचा पारा ४६ अंशावर गेला होता. तीन ते चार दिवस तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत कायम होता. एप्रिल आणि मे महिन्यात असेच काहीसे चित्र होते. जून महिन्यात पाऊस सुरु होताच शहरातील तापमानाचा पारा कमी झाल्यामुळे उकाडा कमी झाला होता. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली असून यामुळे वातावरणात मोठे बदल झाल्याने ऊन वाढले आहे. आठ दिवसांपुर्वी ठाणे शहराचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास होते. परंतु गेल्या आठ दिवसांपासून त्यात वाढ होऊ लागली असून शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठ दिवसांत शहराच्या तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसवरून ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : सेंट जॉन द बाप्टिस्ट शाळेच्या “सेंट जॉन लर्निंग ॲप” चे उद्घाटन

सकाळपासूनच शहरात कडक ऊन पडत आहे. रात्रीच्या वेळेतही वातारवणात उष्णता जाणवते. वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. वाढत्या ऊनामुळे आजारपण वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. वातावरणातील बदल नेमके कशामुळे झाले आहेत आणि तापमान आणखी किती दिवस असे राहील हे याबाबत सांगता येणार नाही, असे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले.

ठाणे शहरातील तापमान आकडेवारी
तारीख तापमान

२६ ऑगस्ट ३३
२७ ऑगस्ट ३४

२८ ऑगस्ट ३४
२९ ऑगस्ट ३३

३० ऑगस्ट ३६
३१ ऑगस्ट ३५

१ सप्टेंबर ३७
२ सप्टेंबर ३५