अंबरनाथः राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने निविदा जाहीर केल्या आहेत. यात अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचाही समावेश आहे. एकूण ४०३ कोटींच्या खर्चातून महाविद्यालय आणि रुग्णालयाची वास्तू उभी केली जाणार असून अंबरनाथ वैद्यकीय शिक्षणाच्या परिघावर नवे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.

अंबरनाथ शहरातील कै. बी. जी. छाया रुग्णालय एकेकाळी अंबरनाथसह आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोठा आधार होते. मधल्या काळात राज्य शासन, स्थानिक अंबरनाथ नगरपालिका प्रशासन यांच्याकडे झालेल्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेत रुग्णालयाच्या सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष झाले होते. सध्या या रुग्णालयात विविध सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याचवेळी अंबरनाथसारख्या शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असावे अशी अनेक वर्षांची मागणी होती. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर हे दोघेही वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी असलेले असल्याने त्यांच्याकडून याबाबत पाठपुराव्याची आशा होती. या दोघांच्या पाठपुराव्यामुळे अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला मंजुरी मिळवण्यात यश आले होते. त्यानंतर अंबरनाथ पूर्वेतील शेतकी सोसायटीच्या भूखंडावर या महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागेचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता या महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने ४०३ कोटी ८९ लाख रुपयांची मर्यादित स्वरुपाची निविदा जाहीर केली आहे.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Kalyan Dombivli Municipal Administration opened modern maternity home in Shaktidham Kolsevadi
कल्याण पूर्वेत ‘शक्तिधाम’मध्ये पालिकेचे पहिले प्रसूतीगृह, महिलांचा कल्याण पश्चिमेतील रुग्णालयात जाण्याचा त्रास वाचला
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ‘सुपरमॅक्स’ कामगारांचा ठिय्या ; एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

राज्यातील पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या उभारणीसाठी ही एकत्रित निविदा जाहीर करण्यात आली असून या एकत्र निविदेची रक्कम २ हजार १९ कोटी ४५ लाख इतकी आहे. केंद्र सरकारच्या अंगीकृत आठ कंपन्यांकडून या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंबरनाथ शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या उभारणीला गती मिळाली आहे. या महाविद्यालयाच्या उभारणीपूर्वीच येथील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अंबरनाथ पालिकेच्या अख्यत्यारितील रुग्णालयाच्या वास्तूमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यात येतो आहे. या महाविद्यालयाच्या उभारणीनंतर वैद्यकीय शिक्षणाच्या परिघावर अंबरनाथ शहर नवे केंद्र म्हणून नावारुपाला येणार आहे.

हेही वाचा – डोंबिवलीचं ‘धगधगतं’ वास्तव; टाईमबॉम्बच्या वातीवर वसलेलं शहर!

४३० खाटा, तर १०० विद्यार्थी क्षमता

अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थांना दरवर्षी प्रवेश दिला जाणार आहे. तर त्याचवेळी येथील रुग्णालयात ४३० खाटा असणार आहेत. त्यामुळे रुग्णांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

Story img Loader