ठाणे – शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाने टेंभीनाका येथील आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केले. त्यांनतर ठाकरे गट खारटन रोड येथील आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी म्हणजेच, शक्तिस्थळमध्ये गेले. या ठिकाणी शिंदे गटाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. ठाकरे गट आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळमध्ये दर्शन घेऊन निघून गेल्याने वाद टाळला. असे असले तरी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांकडे पाहणेदेखील टाळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या निधनानंतर दरवर्षी शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. ठाण्यातही अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर खासदार राजन विचारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत.

हेही वाचा – महिन्यात दुसऱ्यांदा ‘सुपरमून’! सप्ताहामध्ये तीन खगोलीय घटनांची पर्वणी; चंद्र सात टक्के मोठा दिसणार

हेही वाचा – दक्षिण मध्य रेल्वेच्या आठ गाड्यांना मुदतवाढ, ‘या’ शहरांमध्ये जाण्यासाठी झाली सुविधा

शनिवारी आनंद दिघे यांची पुण्यतिथी असल्याने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह शक्तिस्थळ येथे दाखल झाले. यावेळी ‘दिघे साहेब अमर रहे’ अशा घोषणा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. शक्ती स्थळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर्फे २५ रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम आहे. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते सकाळपासून शक्तिस्थळ येथे उपस्थित आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट एकाचवेळी समोर आल्याचे चित्र यावेळी दिसले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि निघून गेले. परंतु दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची भेट घेणे तसेच पाहणेदेखील टाळले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray and shinde group simultaneously at anand dighe samadhi place ssb
Show comments