ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी ‘नमो सैनिक’ म्हणून काम करण्याचे निर्देश शिवसैनिकांना दिले असून त्याचबरोबर महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘नमो सैनिक’ म्हणून काम करावे, असे आवाहन शिंदेंच्या शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी केले आहे. या नमो सैनिक उल्लेखावरून आता ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी टिका सुरू केली आहे. ‘हॅशटॅग लाचार’ असा शब्दप्रयोग वापरत म्हस्के यांच्या ओठातले बाहेर पडले, बाळासाहेबांचा विचार घेऊन चालणारे आहोत असे म्हणणारे आता कोणत्या बिळात लपले आहेत असा आरोप दिघे यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लोकसभेसाठी शिवसेनेचा ‘नमो सैनिक’चा नारा, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांची माहिती

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा निवडूण आणण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. हा शब्द पुर्ण करण्यासाठी राज्यातील लोकसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेची, ही जागा राष्ट्रवादीची, ही जागा भाजपची, असा वाद महायुतीमधील कार्यकर्त्यांनी करू नये. सर्वांनी ‘नमो सैनिक’ म्हणून काम करावे. ‘नमो सैनिक’ म्हणून काम करण्याचे निर्देश शिवसैनिकांना दिले आहेत, असे नरेश म्हस्के यांनी सांगितले. त्याचबरोबर महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘नमो सैनिक’ म्हणून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर टिका केली. ‘याचसाठी केला होता अट्टहास.. शिंदेंची सेना ही शिवसेना नसून आज पासून नमो सेना आणि नमो सैनिक झाले आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारे आहोत असा उठाठेव करणारे आता कोणत्या बिळात लपले आहेत. शेवटी म्हस्केंच्या ओठातले बाहेर पडले, नमो सैनिक झाले आणि यांचा अखेर पडदा उठला. तसेच पुढे #लाचार असेही म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group kedar dighe slams shiv sena leader naresh mhaske over namo sainik remark zws