ठाणे : गेल्या तीन महिन्यांपासून पक्षाशी गद्दारी करून झालेल्या सत्तांतरानंतर ठाणे जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आणि शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून अडकविण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून या संदर्भात त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची गुरुवारी भेट घेऊन निवेदन दिले. शिवसैनिकांवर होणाऱ्या दडपशाहीला आळा घाला, अन्यथा न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार तलावपाळी येथील मध्यवर्ती शाखेमध्ये १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळय़ास असंख्य निष्ठावंत शिवसैनिक मोठय़ा संख्येने आले होते; परंतु फुटीर गटाकडून चिथावणी दिली असतानासुद्धा आम्ही संयम दाखवल्यामुळे आणि कायदा सुव्यवस्थेची जाण ठेवून संघर्ष टाळला, असे निवेदनात म्हटले आहे.

Story img Loader