लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ईडी सरकार हाय हाय, एसटी भाडेवाढ रद्द करा…..प्रवासी उपाशी परिवहन मंत्री तुपाशी…या आशयाचे फलक हातात घेऊन ठाण्यातील उबाठा पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळावारी खोपट येथील एसटी आगारावर चक्काजम आंदोलन केले. सर्वसामान्यांच्या माथ्यावर लादलेली दरवाढ त्वरित रद्द करा तसेच परिवहन मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून खात्याची सुधारणा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही दरवाढ रद्द केली नाही तर, तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी यावेळी दिला.

Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Building catches fire in Thane residents escape safely
ठाण्यात इमारतीला आग, रहिवाशांची सुखरूप सुटका
Attempted kidnapping of Birla College student in Kalyan
कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sanjana Jadhav and Vilas Tare joined Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde
भाजपचे नेते उमेदवारीसाठी शिंदे सेनेत
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या दरात १४.९५ टक्के भाडेवाढ लागू केल्याने राज्यभर संताप व्यक्त केला जात असतानाच, ठाण्यातील उबाठा पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खोपटी एसटी आगारावर चक्काजाम आंदोलन केले. या दरवाढी विरोधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले वेगवेगळ्या आशयाचे फलक विशेष लक्ष वेधत होते.

लोकसभा, विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला होता. परिणामी, एसटीला दर महिन्याला तीन कोटींचा तोटा सहन करावा लागला असल्याचे परिवहन मंत्र्यांकडून सांगण्यात आले. परंतू, एकीकडे लाडकी बहिण योजनेच्या नावावर मते विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या डोळ्यात धुळफेक केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केला आहे. डिझेल, चेसी, टायर यांसारख्या घटकांच्या वाढलेल्या किंमती आणि मागील काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेली वाढ यामुळे एसटी तोट्यात गेली आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून वसूल करावा अशी मागणी जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी यावेळी केली. या आंदोलनात संपर्क प्रमुख नरेश मणेरा, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, संजय तरे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, सचिन चव्हाण, प्रदीप शेडगे, वसंत गवाळे, प्रवक्ते अनिश गाढवे, संजय दळवी, महिला शहर संघटक प्रमिला भांगे, सुनंदा देशपांडे, संगीता साळवी, महेश्वरी तरे आणि विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader