लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली – ठाकुर्ली-चोळे गावातील हनुमान मंदिर ते म्हसोबा चौक दरम्यान रस्त्यावर काँक्रीटीकरण आणि महानगर गॅसतर्फे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाकरिता ठाकुर्ली-चोळे गावातील रस्ता म्हसोबा चौक येथे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी केले आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे

ठाकुर्ली-चोळे गावातील म्हसोबा नगरपर्यंतचा रस्ता अरूंद आहे. या रस्त्यावरून अधिक संख्येने वाहने धावतात. या डांबरी रस्त्यावर सतत खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे या भागात कोंडी होते. हा कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी पालिकेने या भागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे नियोजन केले आहे. १ डिसेंबर रोजी या कामाला प्रारंभ करण्यात येणार होता. काही तांत्रिक कारणामुळे हे काम पालिकेकडून विलंबाने सुरू झाले, असे आफळे यांनी सांगितले.

आणखी वाचा-अभिनेते, दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांना कलागंध पुरस्कार जाहीर

हा मुख्य वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्यावरील कामे विहित वेळेत पूर्ण करा, अशा सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आफळे यांनी पालिका अधिकारी, ठेकेदाराला केल्या आहेत. २७ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

वाहतूक बंद

ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाकडून जुने हनुमान मंदिर ते म्हसोबा चौकापर्यंत जाणारी वाहतूक म्हसोबा चौक येथे पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ही वाहने जानू नगर, बालाजी नगरमार्गे ९० फुटी रस्त्याने इच्छित स्थळी जातील. चोळे गावातून येणाऱ्या वाहनांना जुने हनुमान मंदिर येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने ९० फुटी वळण रस्ता, बंदिश पॅलेस हॉटेलमार्गे किंवा फशीबाई भोईर चौकातून इच्छित स्थळी जातील. रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना वाहतूक बदल लागू राहणार नाही, असे वाहतूक विभागाने जाहीर केले आहे.

आणखी वाचा-मुंबई नाशिक महामार्ग खड्डेमुक्तीच्या मार्गावर, पावसाळ्यापर्यत काम पुर्ण करण्याच्या सूचना

कोंडीने प्रवासी हैराण

घरडा सर्कल येथे रस्ता रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या भागात दररोज संध्याकाळी कोंडी असते. कल्याणकडून येणारे-जाणारे बहुतांशी वाहन चालक ठाकुर्ली चोळे गाव रस्त्यावरून डोंबिवलीत येजा करत होते. आता ठाकुर्ली-चोळे गावातील रस्ता बंद केल्याने या वाहन चालकांना घरडा सर्कल येथून प्रवास करावा लागणार आहे. घरडा सर्कल येथील कोंडीत आणखी भर पडणार आहे.

बुधवारपासून सावळाराम क्रीडा संकुलात एक महोत्सव सुरू झाला. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे घरडा सर्कल येथे कोंडी होणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. घरडा सर्कल, ठाकुर्ली भागात कोंडी होणार नाही, अशा पध्दतीने या भागात वाहतूक पोलीस तैनात आहेत, असे आफळे यांनी सांगितले.

“ ठाकुर्ली-चोळे रस्त्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता वर्दळीचा आहे. या रस्त्यावरील कामे १५ दिवसाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे वाहतूक विभागाकडून सूचित केले आहे.” -अजय आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, डोंबिवली.