डोंबिवलीतून ठाकुर्ली उड्डाण पूलावरुन थेट ९० फुटी रस्त्यावर उतरण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या ठाकुर्ली उड्डाण पुलाचे काम पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे रखडले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राने दिली. पुलाच्या कामामुळे बाधित रहिवासी पुनर्वसन, इमारत, रस्ते सीमांकन ही कामे नगररचना विभागाकडून बांधकामाला करुन देण्यात येत नसल्याने बांधकाम विभागाला या कामाला गती देण्यात अडथळे येत असल्याचे कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>बेशुद्ध करण्याचे औषध फवारून लूट ; अंबरनाथच्या मोहनपुरम भागातील घटना, दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण

पालिका बांधकाम विभागाचे अधिकारी सातत्याने नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालक नगररचना दीक्षा सावंत यांना ठाकुर्ली उड्डाण मार्गिकेतील नगररचना विभागाच्या अखत्यारितील अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने कळवित आहेत. या विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद बांधकामाला विभागाला मिळत नसल्याने डोंबिवली, ठाकुर्लीतील महत्वपूर्ण अशा पुलाचे काम रखडले आहे.

हेही वाचा >>>कल्याण: “मनसे बरोबर युती म्हणजे…” महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रामदास आठवले म्हणाले…

चोळेतील कोंडीने हैराण
डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील बहुतांशी वाहन चालक कल्याण येथे जाण्यासाठी ठाकुर्ली चोळे गाव हा मधला मार्ग पसंत करतात. या रस्त्याने डोंबिवलीतील प्रवासी १० मिनिटात कल्याण येथे पोहचतो. डोंबिवली पश्चिमेतील वाहन चालक ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलावरुन स. वा. जोशी शाळे जवळ उतरुन तेथे डावे वळण घेऊन ठाकुर्ली चोळे गावातून ९० फुटी रस्त्याने कल्याण दिशेेने जातो. डोंबिवलीतील काही वाहन चालक पेंडसेनगर मधून ठाकुर्ली महिला समिती शाळेकडून हनुमान मंदिराकडून ९० फुटी रस्त्याकडे जातो.

चोळे गावातील हनुमान मंदिर रस्ता आठ फुटाचा अरुंद आहे. या हनुमान मंदिराच्या तिठ्यावर एकाच वेळी कल्याण, एमआयडीसी, ठाकुर्ली रेल्वे स्थानक, डोंबिवलीतील वाहने एकाच वेळी समोरा समोर येतात. या ठिकाणी दररोज वाहन कोंडी होते. या रस्त्याची जागा गावठाण क्षेत्र आहे. अनेक वर्षापासून या रस्त्यावर रहिवासी राहतात. त्यामुळे पालिकेला त्यांच्यावर कारवाई करता येत नाही.कल्याणकडून ९० फुटी रस्त्याने येणारा वाहन चालक चोळे हनुमान मंदिर रस्त्याने डोंबिवलीत येतो. घरडा सर्कल, मंजुनाथ शाळा भागातील वाहन कोंडीतून सुटका करुन घेण्यासाठी प्रवासी चोळे गावातील वाहन कोंडी पसंत करतात. ते याच मार्गाला पसंती देतात.

हेही वाचा >>>उल्हासनगरः स्वारस्य अभिव्यक्तीवरून कर उपायुक्त वादात; मंजुरीविनाच स्वारस्य अभिव्यक्ती मागवल्याने कर उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस

उड्डाण पुलाची प्रतीक्षा
ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलावरुन ठाकुर्ली रेल्वे फाटक, म्हसोबानगर, संतवाडी झोपडपट्टी वरुन उड्डाण पूल ९० फुटी रस्त्यावर उतरण्याचे काम दोन वर्षापासून संथगतीने सुरू आहे. ठाकुर्ली रेल्वे पुलाकडून ठाकुर्ली रेल्वे फाटकापर्यंत ठेकेदाराने काम पूर्ण केले आहे. ९० फुटी रस्त्याकडे संतवाडी, म्हसोबानगर झोपडपट्टीवरुन जाणाऱ्या पुलाचे काम तीन महिन्यापासून थांबले आहे. हे काम लवकर पूर्ण करण्यात यावे अशी प्रवाशांची मागणी वाढू लागली आहे. या कामासाठी एमएमआरडीए पालिकेला निधी उपलब्ध करुन देते. यापूर्वी २३ कोटीचा निधी उपलब्ध होता. आता नव्याने सुमारे २० कोटीची तरतूद केली असल्याचे कळते. उर्वरित पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी नगररचना विभागाने संतवाडी, म्हसोबानगर झोपडपट्टी भागातील इमारतींचे तोडकामासाठी सीमांकन, बाधितांचे पुनर्वसन या कामासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या विभागाचे अधिकारी बांधकाम नस्ती, टीडीआर आणि आता डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती चौकशी प्रकरणाची कागदपत्रे पुरविण्याच्या कामात व्यस्त असल्याने नगररचना अधिकाऱ्यांचे पुलाच्या कामाकडे लक्ष नसल्याचे बांधकाम अधिकारी सांगतात. संतवाडीतील ४५, म्हसोबानगर मधील ३८ रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रिया पालिकेने पार पाडल्या आहेत.

हेही वाचा >>>डोंबिवलीत तरुणांच्या दोन गटात तुफान राडा ; दत्तनगर चौकातील घटना

नगररचना विभागाचे मौन
नगररचना विभागाच्या साहाय्यक संचालक नगररचना दीक्षा सावंत यांना ठाकुर्ली पुलाच्या माहितीसाठी सतत दोन दिवस अनेक वेळा संपर्क करुनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नगररचना विभागातील इतर अधिकाऱ्यांनी आम्हाला याविषयी काही माहिती नाही. ही माहिती आमच्या प्रमुख सावंत देतील असे सांगतात. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांना संपर्क केला. तेही संपर्काला प्रतिसाद देत नाहीत.

” नगररचना विभागाकडूुन काही आवश्यक कामे पूर्ण झाल्यानंतर ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या थांबलेल्या कामाला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”- अर्जुन अहिरे ,शहर अभियंता