sexual assault on women thane : ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरांमध्ये मागील पाच महिन्यांत लैंगिक अत्याचाराचे १४६ गुन्हे दाखल असून विनयभंगाचे २५३ प्रकरणे समोर आली आहेत. या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बदलापूर येथील दोन लहान मुलींवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी एकत्र येत रेल रोको करत आंदोलन केले. या प्रकारानंतर आता जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. जुलै महिन्यात शिळफाटा येथील एका मंदिराच्या परिसरात मंदिरातील तीन सेवेकऱ्यांनी लैंगिक अत्याचार करून महिलेची हत्या केली होती. त्यावेळी नवी मुंबईतील नागरिकांचा जनआक्रोश उसळला होता. हे प्रकरण ताजे असताना उरण येथे एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही आता नागरिक प्रश्चचिन्ह उपस्थित करू लागले आहे.

Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
psychiatrist sexually abused nearly hundred women in Hudakeshwar area
नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
Kerala Sexual Assual Case
Kerala Sexual Case : लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६४ पैकी २० जणांना अटक; ४० जणांचे नंबर वडिलांच्या मोबाईलमध्ये सेव्ह! चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात

हेही वाचा – Badlapur School Case : बदलापुरात आंदोलन का पेटले? पोलिसांचा निष्काळजीपणा, शाळा प्रशासनाचे मौन आणि…

हेही वाचा – कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर सरकत्या जिन्यांची उभारणी

ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ही शहरे ठाणे शहर आयुक्तालय क्षेत्रात येतात. ठाणे शहर आयुक्तालय क्षेत्रात १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत महिलांवरील लैंगिक अत्याचाराची १४६ प्रकरणे समोर आली आहेत. तर विनयभगांची २५३ प्रकरणे समोर आली आहेत. तर मागील वर्षीही याच कालावधीत लैंगिक अत्याचाराची १४८ प्रकरणे समोर आली होती. जिल्ह्यातील इतर आयुक्तालय क्षेत्रात अशीच परिस्थिती आहे.

महिना- लैंगिक अत्याचार – विनयभंग

मार्च – ३५ – ६२

एप्रिल – ३६ – ४२

मे – २५ – ५८

जून – २५ – ५१

जुलै – २५ – ३७

एकूण – १४६ – २५३

Story img Loader