ठाणे : ठाण्यात ठाकरे गटाच्या वतीने रविवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यापूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी टेंभीनाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि शाल अर्पण केली होती. ठाकरे गटाचे नेते तेथून निघून गेल्यावर शिंदे गटाचे कार्यकर्ते तिथे आले. त्यांनी पुतळ्यावरील शाल, पुष्पहार काढून रस्त्यावर फेकून दिला. तसेच पुतळ्याचा दुग्धाभिषेक केला. या प्रकारावरून ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख तसेच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला. केदार दिघे यांनी त्यासंदर्भाचा व्हिडीओ देखील प्रसारित करत टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. पक्ष बांधणीसाठी ठाकरे गटाने राज्यात कार्यकर्ता सुसंवाद मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्याची सुरुवात रविवारपासून ठाण्यात झाली. या मेळाव्यास खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, राजन विचारे, चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, भास्कर जाधव, सुनील प्रभू उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी ठाण्यात दुचाकी रॅली आयोजित करण्यात आले होते. ही रॅली आनंद आश्रमाजवळ आली असताना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी सुरु झाली. आनंद आश्रमासमोर पोलीस बंदोबस्त असतानाही दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते. या घटनेमुळे तणावाचे वातावरण पसरले होते.

यानंतर संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी टेंभीनाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि शाल अर्पण केली. यानंतर सर्व नेते शक्तीस्थळाच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर आनंद आश्रमात जमलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पुतळ्याजवळ आले. त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अर्पण केलेले पुष्पहार आणि शाल काढून रस्त्यावर फेकून दिले. तसेच पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.

या प्रकारानंतर ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी नाराजी व्यक्त केली. केदार दिघे यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट टाकली. त्यामध्ये म्हटले की, दिघे साहेबांच्या पुतळ्याला घातलेला फुलांचा हार,भगवी शाल रस्त्यावर फेकून देताना मिंध्ये गटाच्या लोकांना लाज कशी वाटली नाही…तुमच्या गद्दारीच्या राजकारणासाठी त्या देव माणसाचा अपमान वारंवार का करता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.