मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आनंदोत्सव; कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे कोपरी पांचपाखाडी मतदारसंघातील उमेदवार एकनाथ शिंदे  यांना आठव्या फेरी अखेर ४२ हजार ६६६ मते मिळाली असून ते ३५ हजार ७५० मतांनी आघाडीवर आहेत.

Thane assembly election 2024 Workers burst firecrackers outside Chief Minister Eknath Shinde house
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आनंदोत्सव; कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी (PC:TIEPL)

ठाणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे कोपरी पांचपाखाडी मतदारसंघातील उमेदवार एकनाथ शिंदे  यांना आठव्या फेरी अखेर ४२ हजार ६६६ मते मिळाली असून ते ३५ हजार ७५० मतांनी आघाडीवर आहेत. शिंदे आघाडीवर असल्याने शिंदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. 

ठाणे जिल्ह्यात एकूण १८ मतदारसंघ आहेत. यामध्ये ठाणे, ओवळा-माजीवाडा, कोपरी पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पुर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड,  अंबरनाथ, उल्हासनगर, ,ऐरोली, बेलापूर,भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पुर्व, मिरा भाईंदर, या मतदार संघाचा समावेश आहे.  यामध्ये शहरी आणि ग्रामीण अशा मतदार संघांचा समावेश आहे. या १८ मतदार संघामधून २४४ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

NCP Ajit Pawar MLA Anna Bansode scored hatt rick from Pimpri Assembly constituency in city
पिंपरीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde On Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Eknath Shinde : महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने, मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लाडक्या बहिणी…”
Maharashtra Assembly Election Results 2024 Live
Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates: खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादी कोणती? हे लोकांनी दाखवून दिले – एकनाथ शिंदे
assembly election 2024 result ncp ajit pawar party MLA Sunil Shelke wins in Maval constituency
मावळ ‘पॅटर्न फेल’, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके विजयी
Devendra Fadnavis
Pravin Darekar : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, आमच्या पक्षाच्या…” भाजपाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

हेही वाचा >>>मामाच्याच हातून चिमुकलीची हत्या, उल्हासनगरमधील चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (महायुती) विरुद्ध दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे तसेच काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे अशी लढत आहे. सातव्या फेरीत मुख्यमंत्री यांना ४२ हजार ६६६ मते मिळाली आहेत. शिंदे हे ३१ हजार ७१९ मतांनी आघाडीवर आहेत. तर आनंद दीघे यांचे पुतणे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांना १०,९४७ मते मिळाली आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आघाडीचा आनंदोत्सव त्यांचे कार्यकर्ते साजरा करत असल्याचे दिसत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane assembly election 2024 workers burst firecrackers outside chief minister eknath shinde house amy

First published on: 23-11-2024 at 13:57 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या