ठाणे जिल्ह्यात एकूण १८ मतदारसंघ आहेत. यामध्ये ठाणे, ओवळा-माजीवाडा, कोपरी पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पुर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, ,ऐरोली, बेलापूर,भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पुर्व, मिरा भाईंदर, या मतदार संघाचा समावेश आहे. यामध्ये शहरी आणि ग्रामीण अशा मतदार संघांचा समावेश आहे. या १८ मतदार संघामधून २४४ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.
हेही वाचा >>>मामाच्याच हातून चिमुकलीची हत्या, उल्हासनगरमधील चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा
कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (महायुती) विरुद्ध दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे तसेच काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे अशी लढत आहे. सातव्या फेरीत मुख्यमंत्री यांना ४२ हजार ६६६ मते मिळाली आहेत. शिंदे हे ३१ हजार ७१९ मतांनी आघाडीवर आहेत. तर आनंद दीघे यांचे पुतणे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांना १०,९४७ मते मिळाली आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आघाडीचा आनंदोत्सव त्यांचे कार्यकर्ते साजरा करत असल्याचे दिसत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.