शहापूर : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच, जमिनीच्या वादातून शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचे दोन्ही पाय जायबंदी झाले आहेत. याप्रकरणी तीन जणांना कसारा पोलिसांनी अटक केली असून इतर चार जणांचा शोध सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कदम उघडे हे अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून त्यांचा जमिनीबाबत जुना वाद होता. उघडे यांच्यावर हल्ला करणारे कुंजल सांडे (२८), शांताराम भगत (३६) आणि कैलास कामडी (२८) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. कदम उघडे यांना पुढील उपचारासाठी कल्याण शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लखोरांविरोधात गुन्हा दखल करून त्यांचा शोध सुरू केला होता. कदम उघडे यांच्या मोटारीची देखील तोडफोड करण्यात आली आहे.

हेही वाचा – VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब

हेही वाचा – ठाणे खाडी किनारी मार्गाचा ठेका रद्द करा, आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

u

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हातील शहापूर तालुक्यातील कसारा भागात अजनुप ग्रामपंचायत असून या अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे हे कामानिमित्ताने गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घरातून निघाले होते. अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायदरा गावाच्या माळ रानात पोहचले असता काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची मोटार अडविली. त्यानंतर त्यावर दगडांचा मारा करण्यात आला. काहीवेळाने हल्लेखोरांनी मोटारीमध्ये असलेले कदम उघडे यांना मोटारीतून बाहेर खेचून बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या दोन्ही पायाला जबर दुखापत झाल्याने ते जायबंदी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी कल्याण येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन हल्लेखोरांना अटक केली आहे, तर चार जणांचा शोध सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane attack on former sarpanch of ajnup gram panchayat in shahapur taluka due to land dispute ssb