दिवाळी निमित्ताने ॲानलाईन खरेदी करताना नागरिकांनी सावधान. कारण, कमी किमतीमध्ये वस्तू देतो असे सांगून फसवणूकीची काही संकेतस्थळ प्रसारित भामट्यांकडून प्रसारित केली जात आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर व्यक्तीने बँकेची माहिती भरल्यास खातेच भामट्यांकडून रिक्त केले जाते. त्यामुळे अशा फसवणूक होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनीही जनजागृती सुरू केली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली : ठाकुर्लीमध्ये वृध्देची लूट

suspense thriller movies on ott
OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ थरारक सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, चित्रपटांच्या रहस्यमय कथा ठेवतील खिळवून; पाहा यादी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
Teacher Teach The Arm Span To Height Ratio In Class
VIRAL VIDEO : विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनोखा अंदाज, उंची मोजण्यासाठी दाखवला हा जबरदस्त हॅक, एकदा पाहाच
Free Visa pakistan
Free Online Visa : इंग्लंड, अमेरिका व कॅनडामधील शीख भाविकांना पाकिस्तानचा मोफत ऑनलाइन व्हिसा; भारतीयांसाठीही सुविधा!
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी

सण उत्सवानिमित्ताने नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात वस्तू आणि कपडे खरेदी केली जातात. दिवाळीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण हे अधिक असते. याच संधीचा गैरफायदा घेत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय होत असतात. व्हाॅट्सॲप, टेलेग्राम, फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांवर आंतरराष्ट्रीय कंपन्यांची फसवी संकेतस्थळे किंवा लिंक तयार केली जात असतात. वस्तू कमी किमतीमध्ये मिळत असल्याने प्रलोभनामुळे अनेकदा ग्राहक त्या लिंकवर जात असतात. या लिंकमध्ये पैसे भरल्यानंतर समोरील भामट्यांकडून पैसे उकळले जात असतात. तसेच अनेकदा काही मोठ्या कंपन्यांच्या संकेतस्थळांवरून एखादी वस्तू मागविल्यास त्यांना रिकामे खोके किंवा इतर काहीतरी वस्तू पाठविण्यात आल्याचेही प्रकार समोर आले होते.

हेही वाचा >>>नवी मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस सुरू, पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा

येत्याकाही दिवसांत दिवाळीचा मूहूर्त आहे. त्यामुळे नागरिकांकडून पुन्हा एकदा ऑनलाईन खरेदीचा ओढा अधिक असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी विविध माध्यमातून नागरिकांना खरेदी करण्यापूर्वी जनजागृती करत सूचना देण्यास सुरूवात केली आहेत.

ऑनलाईन खरेदी करताना काय करावे
१) एखादा संकेतस्थळ सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी संकेतस्थळामध्ये ‘एचटीटीपीएस’ ही अक्षरे, कूलूपाचे चिन्ह असणे आवश्यक आहे.
२) एखादी वस्तू खरेदी करताना वस्तू घरी आल्यानंतरच पैसे द्या. म्हणजेच, सीओडीचा पर्याय निवडा.
३) कोणत्याही सार्वजनिक संगणकावरून किंवा सार्वजनिक वायफायवरून वस्तू खरेदी करू नका.
४) गिफ्ट कार्ड संदर्भाचे संदेश टाळावे.
५) प्रत्यक्ष दुकानांत जाऊन खरेदी केल्यास आर्थिक फसवणूक टाळता येऊ शकते.

हेही वाचा >>>ठाण्यात जिवितहानी टाळण्यासाठी आग प्रतिबंधक प्रशिक्षण ; अग्निशमन दलाकडून गृहसंकुलांमध्ये शिबीरांचे आयोजन

सण-उत्सवांच्या कालावधीत नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात वस्तू खरेदी केल्या जातात. अद्याप फसवणूकीच्या तक्रारी आमच्या पर्यंत आलेल्या नाहीत. परंतु नागरिकांनी ऑनलाईन खरेदी करताना आर्थिक फसवणूक होणार नाही यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. एखाद्या मोठ्या कंपनीच्या संकेतस्थळावरून खरेदी केली आणि फसवणूक झाली असेल तर तेथील मदत क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. तसेच नागरिकांना पोलीस ठाण्यातही तक्रार देता येऊ शकते. – निलम वाव्हळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे अन्वेषण, ठाणे शहर पोलीस.