सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक-२ च्या डांबरी पृष्ठभाग नूतनीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने १ नोव्हेंबर २०१९ पासून हाती घेण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
नूतनीकरणाचे काम टप्पेनिहाय करण्यात येणार असून वाहतुकीस कुठलाही अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे.
या कामादरम्यान मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या हलक्या वाहनांना ठाणे खाडी पूल क्रमांक १ चा वापर करता येईल. या कामासाठी मुंबई व नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी दर्शवलेल्या नुसार वळण रस्त्याचा वापर करावा. नूतनीकरणाच्या कामादरम्यान वाहनचालकानी महामंडळाला सहकार्य करावे, ही विनंती.