ठाणे : भिवंडी शहरात गेल्याकाही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ठाणे- भिवंडी-कल्याण या मेट्रो निर्माणाची कामे सुरू आहेत. तसेच रस्त्याकडेला असलेल्या गटारांची साफ-सफाई झालेली नाही. त्याचा परिणाम भिवंडी शहरात बसला. भिवंडी शहरात मुख्य मार्ग तुंबले. शहरातील कशेळी-काल्हेर भागातील मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील रहिवाशांचे हाल झाले आहेत. नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून पायपीट करत जावे लागले. तर, अनेक दुचाकी या पाण्यामध्ये बंद पडल्या होत्या. त्यामुळे अपघाताची भितीही व्यक्त केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in