मेट्रो मार्ग ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) या मर्गिकेतील ठाणे ते भिवंडी दरम्यान १२.७ किमी चा पहिला टप्पा प्रगतीपथावर असून यामध्ये एकुण सहा पुर्णतः उन्नत स्थानके असणार आहेत. मर्गीकेच्या या टप्प्यातील स्थानकांची ६४% स्थापत्य कामे पूर्ण झाली असून, एकूण ७० टक्क्यांपर्यंतची भौतिक कामांची प्रगती साध्य करण्यात आल्याचं सरकारमार्फत सांगण्यात आलं आहे.
कशेळी खाडीवर मेट्रो मर्गिकेच सुमारे ५०% काम पूर्ण
मेट्रो मार्ग ५ च्या मार्गामध्ये कशेळी येथे ५५० मीटर लांबीची खाडी आहे. जीच्यावर मेट्रोचा पूल उभरण्याकरिता सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर करून एकुण १३ स्पॅन उभारण्यात येणार आहेत. सध्यस्थितीत ८ स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. या प्रत्येक स्पॅनची लांबी सुमारे ४२ मीटर इतकी असेल.
कोणती स्थानकं असणार?
मेट्रो मर्गिका ५ च्या पहील्या टप्प्यात घोडबंदर रोडवरील कापूरबावडी (मेट्रो ४ व ५ चे एकत्रीकृत स्थानक), बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा व धामणकर नाका (भिवंडी) या स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो मार्गिका ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.
या मार्गामुळे ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीची एक नवीन आणि पर्यावरणपूरक व्यवस्था उपलब्ध होईल. तसेच उपनगरीय रेल्वे, बेस्ट अथवा टीएमटी बस सेवा यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील भार कमी होण्यास मदत होईल. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यावर प्रवासाच्या वेळेत साधारणतः २० मिनिटांची बचत होईल.
स्पेशल स्टील गर्डर स्पॅन बसवणार
“मेट्रो मार्गिका ५ साठी कशेळी येथे सेंट्रलाइज्ड डेपोसाठी जागा निश्चित करण्यात आली असून भूसंपादन आणि निविदा प्रक्रियाचे काम प्रगतीपथावर आहे. या मर्गिकेतील अंजूरफाटा येथे रेल्वे ओव्हर ब्रिजकरिता स्पेशल स्टील गर्डर स्पॅन बसवण्यात येणार आहेत, ज्याचे काम लवकरच सुरू होईल”. अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.