Thane Building Collapsed : ठाण्यातील भिवंडीमध्ये एक दोनमजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

जुनी होती इमारत, एकाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार कोसळलेली ही इमारत जुनी होती. इमारत कोसळल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली. दुर्घटनेनंतर बाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचावपथकाला पाचारण करण्यात आले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून जीवित तसेच वित्तहानीचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

Story img Loader